मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. गुरूवारी देखील शेअर बाजार कोसळल्याचे दिसून आले. निफ्टीत 345 अं

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये सातत्याने चढ-उतार दिसून येत आहे. गुरूवारी देखील शेअर बाजार कोसळल्याचे दिसून आले. निफ्टीत 345 अंकांची घसरण होऊन तो 22,000 अंकांच्या खाली आला. तर सेन्सेक्स 1062 अंकांनी कोसळून 72,404 च्या पातळीवर बंद झाला. या आठवड्याची ही सर्वात मोठी घसरगुंडी ठरली. मागील पाच सत्रांत सेन्सेक्स 75000 अंकांवरून 72000 अंकांवर आलाय. तर निफ्टीही लोळण घालत आहे. 22750 वरून 21957 अंकांवर आला आहे.
शेअर बाजारात मोठी पडझड बघायला मिळाली. बीएसईच्या लिस्टेड टॉप 30 शेअर्सपैकी 25 शेअर्सनी आपटी खाल्ली. फक्त 5 शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळाली. टाटा मोटर्सचे शेअरमध्ये साधारण दोन टक्के, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये 1.48 टक्के, एसबीआय शेअर्समध्ये 1.27 टक्के, इन्फोसिस, एचसीएलच्या शेअर्समध्ये किरकोळ वाढ बघायला मिळाली. शेअर बाजार खुला होताच सुरुवातीला शेअर्समध्ये किरकोळ घसरण झाली होती. मात्र, त्यानंतरच्या नफेखोरीच्या तडाख्याने बघता बघता सगळेच चित्र पालटून गेले. शेअर बाजारात मोठी घसरण झाली. विदेशी गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या विक्रीचा सपाटा लावला. तर काही कंपन्यांच्या खराब कामगिरीमुळेही शेअर बाजारात कोसळधार बघायला मिळाली. शेअर बाजारातून रग्गड कमाईच्या गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 7.3 लाख कोटी रुपये बुडाले.
COMMENTS