Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडची धग पोहचली राजधानी मुंबईत ; संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत काढला मोर्चा

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्या, संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसा

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात
आ. रोहित पवारांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या
भारनियमनाविरोधात केडगावकर रस्ता रोकोच्या पवित्र्यात

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्या, संतोष देशमुख यांना न्याय द्या या मागणीसाठी बीड, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात मोर्चे काढल्यानंतर शनिवारी मुंबईत सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी मुंबईत मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान हा मार्ग ठरवण्यात आला असून या मोर्चाला सर्वपक्षीय नेते तसेच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित झाले आहेत. मुंबईतील मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानपर्यंत असलेल्या या मोर्चाला सुरूवात झाली.
यावेळी मोर्चाला संबोधित करतांना सर्वपक्षीय नेत्यांकडून निवेदन करण्यात आले. यात म्हटले आहे की, शासनाला आम्ही वारंवार मागणी केली आहे की, जो फरार आरोपी आहे त्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक केली जावी. तसेच जे आरोपी पकडले आहेत त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे प्रकरण असेल किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचे प्रकरण असेल, यात क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. समाजात या घटनांबद्दल आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या लोकभावनेची दखल घेऊन सक्त कारवाई करावी, अशी मागणी या मोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS