Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी ः साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढून ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है! ही ऐतिह

अमृतवाहिनीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचे 100 टक्के प्लेसमेंट
अंगणवाडी सेविकांचा 20 फेबु्रवारीपासून बेमुदत संप
शहाजापूर येथे टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती विसर्जन

कोपरगाव प्रतिनिधी ः साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी आझाद मैदान येथे मोर्चा काढून ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है! ही ऐतिहासिक घोषणा दिली होती. देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाली तरी आजही देशातील आर्थिक, सामाजिक, सामाजिक विषमता दिसून येत असून अण्णा भाऊ साठे यांनी दूरदृष्टीने केलेली भविष्य वाणी खरी असल्याचे दिसून येत आहे असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र देशातून इंग्रज गेले तरी देशातील गोर गरीब, कष्टकरी, शेतकरी, मजूर, हमाल महिला यांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल का? या प्रश्‍नामुळे 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णा भाऊ साठे यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे मोर्चा काढून ये आझादी झुठी है! देश की जनता भुकी है! अशी भीती व्यक्त केली होती. देशभर स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव साजरा करत असताना अण्णा भाऊ साठे यांच्या या घोषणेचा अमृत महोत्सव म्हणून बुधवार 16 ऑगस्ट 2023 रोजी अण्णा भाऊ साठे स्मारक कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलना च्या वतीने अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले या वेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांनी दूरदृष्टीने व्यक्त केलेली भीती दुर्दैवाने आजही खरी ठरत असून स्वातंत्र्य नंतर देशात गरिबी, बेरोजगारी, धर्मांधता हे प्रश्‍न तसेच असल्याचे दिसून येते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरण कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल, विद्रोही साहित्यिक अकबर शेख, निसार शेख, सोमनाथ सोळसे, ज्ञानेश्‍वर घोडेस्वार, गोरख देव्हाडे आदी उपस्थित होते.

COMMENTS