कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील अंकुश उर्फ पिंटू शिंदे यांनी त्यांच्या दुकानात वडापाव खाण्यासाठी आलेले दादा शेंडगे रा. शेगुड ता.
कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथील अंकुश उर्फ पिंटू शिंदे यांनी त्यांच्या दुकानात वडापाव खाण्यासाठी आलेले दादा शेंडगे रा. शेगुड ता. कर्जत यांची ९० हजार रुपये असलेली बॅग प्रामाणिकपणे परत दिली.
त्याचे झाले असे, माहिजळगाव येथे कर्जत रोडवर अंकुश शिंदे यांचे वडापावचे दुकान आहे. दुकानात सायंकाळी सहाच्या सुमारास दादा शेंडगे माहिजळगावहून गावी शेगुडला जात असताना शिंदे यांच्या दुकानावर वडापाव खाण्यासाठी थांबले. त्यावेळेस त्यांच्यासोबत ९० हजार रुपये असलेली बॅग होती. वडापाव खाल्ल्यानंतर ती बॅग सोडून ते तसेच पुढे कर्जतकडे निघून गेले.
कर्जतला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या सोबत असलेली पैशाची बॅग हरवली आहे. त्यावेळेस ती पुन्हा रस्त्याने शोधत माहिजळगाव येथे आले. त्यांनी शिंदे यांच्याकडे विचारपूस केली. अंकुश शिंदे यांनीही माणुसकीचे दर्शन देत त्यांना ती बॅग सापडली आहे असे म्हणत खुशीने त्यांच्याकडे त्यातील ९० हजार रुपये व ती बॅग सुपुर्त केली. अंकुश शिंदे यांच्या प्रामाणिकपणाचे माहिजळगाव आणि परिसरात कौतुक होत आहे.Attachments area
COMMENTS