Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाचे सह्यांचे अधिकार काढले

श्रीगोंदा प्रतिनिधी ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांची मासिक सभा सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी पार

शिष्यवृत्ती…शिक्षण आणि जुळले प्रेमही…
फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत संगमनेर तालुका जिल्ह्यात प्रथम

श्रीगोंदा प्रतिनिधी ः श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांची मासिक सभा सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी पार पडली या सभेत सचिव दिलीप डेबरे यांच्यावर बाजार समितीच्या सेवानिवृत्त झालेल्या सहा कर्मचार्‍यांची जवळपास एक कोटीची देण दिलेली नाहीत कर्मचार्‍यांचे देणे बाकी असताना सातवा वेतन आयोग लागू करून स्वतःचा पगार दरमहा दीड लाख रुपये करून घेतला मागील फरकही घेतला.असे अनेक आरोप करत त्यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी त्यांच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र लगड यांना सह्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. गेल्या पंचवीस वर्षांपासून सचिव म्हणून दिलीप डेबरे काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे आलेल्या होत्या. तात्कालीन संचालक मंडळाने तक्रारीची दखल घेतली नाही. असे संचालक मंडळाचे म्हणणे आहे. सभेमध्ये संचालकांनी बहुमताने ढेबरे यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठीचा ठराव मंजूर केला त्यामध्ये सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनीषा मगर, संचालक भास्कर वासकर, प्रशांत उगले, बाबासाहेब जगताप, दीपक पाटील भोसले, नितीन डुबल, अजित जामदार, अंजली रोडे, दत्तात्रेय गावडे, किसन सिदनकर, लैकिक मेहता यांच्या सह्या आहेत.

COMMENTS