गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले

कर्जत/प्रतिनिधी : देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर संदीप छगन मांडगे याने गुरुवारी (30 डिसेंबर) सा

शेजमजूरांच्या डोळ्यात निघाल्या अळ्या
शरद पवारांची ‘कात्रजचा घाट दाखवणारी खेळी’ अनेकांना न उलगडणारी ! l पहा LokNews24
तरुणांनी संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ः निवृत्ती महाराज देशमुख

कर्जत/प्रतिनिधी : देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून कर्जतमध्ये प्रांत कार्यालयाबाहेर संदीप छगन मांडगे याने गुरुवारी (30 डिसेंबर) सायंकाळी रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गोळीबार करणार्‍या संदीप मांडगे यास अटक केली. मात्र, गोळीबाराच्या या घटनेने प्रांत कार्यालय व परिसर हादरला.
याबाबत भरत नामदेव मांडगे (वय 45 वर्षे, धंदा शेती, रा. रेहकुरी ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रेहेकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थान जमीन गट नंबर 70,71,72,73 मध्ये एकुण 75 एकर क्षेत्र आहे. हे क्षेत्र बरेच वर्षापासून आमचे भावकीतील पूर्वीचे चार कुटूंब वहीत करून शेत जमिन खात होते. कोकनाथ महादेव मंदिराची आम्ही देखभाल करीत होतो, परंतु आमचे भावकीतील संदीप छगन मांडगे याने वरील चारही शेत गटाची देवस्थानाचे नावाने ट्रस्ट स्थापन करून त्याच्या घरातील सर्व अध्यक्ष व सभासद केलेले आहेत. संदीप छगन मांडगे याने इतर दुसर्‍या भावकीतील लोकांचा काहीएक संबंध नाही व इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी येथे दावा दाखल केलेला आहे. त्यावरून मला व आमचे भावकीतील लोकांना 30 डिसेंबर रोजी उपविभागीय दंडाधिकारी कर्जत विभाग कर्जत येथे तारीख असल्याने मी व आमचे भावकीतील बरीच मंडळी तारखेस आलेलो होतो. कर्जतचे उपविभागीय दंडाधिकारी येथील तारीख झाल्यानंतर मी, शांतीलाल बाबु मांडगे (वय 69 वर्षे), रोहीदास खंडू मांडगे (वय 75 वर्षे), शहाजी बाबू मांडगे (वय 55 वर्षे), आश्रु यशवंता मांडगे (वय 75 वर्षे), भानुदास यशवंत मांडगे (वय 80 वर्षे), हारीभाऊ आन्ना मांडगे (वय 55 वर्षे), नारायण देवीदास मांडगे (वय 50 वर्षे), आप्पा गंगाराम मांडगे (वय 55 वर्षे), धनराज खंडू मांडगे (वय 50 वर्षे, सर्व रा. रेहेकुरी ता. कर्जत) असे आम्ही सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ आम्ही थांबलो असताना त्यावेळी संदीप छगन मांडगे (वय 32 वर्षे) व सचिन छगन मांडगे (वय 30 वर्षे, दोन्ही रा. रेहेकुरी) हे तेथे आले. त्यावेळी माझा चुलत भाऊ शहाजी बाबू मांडगे याने त्याची मोटारसायकल मला घरी घेवून जाण्याचे सांगितल्याने मी मोटारसायकल घेवून घरी निघालो होतो. त्याचवेळी संदीप छगन मांडगे याने मला, ए कुत्र्या तू मोटारसायकल घेवून जावू नको, खाली उतर, असे म्हणून त्याने मला शिवीगाळ व दमदाटी करून चापटीने मारहाण केली. त्यावेळी आमच्या दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन झटापट चालू असताना संदीप छगन मांडगे याने त्याच्या कंबरेचे रिव्हॉल्व्हर काढून मला व माझ्यासोबत असलेले माझे नातेवाईक यांच्या जीवितास धोका होऊ शकतो हे माहीत असताना रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायर केला. त्यानंतर संदीप छगन मांडगे हा निघून गेला, असे या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी घेतली धाव
गोळीबार घटनेची माहिती फोनवरून मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार शाम जाधव, पांडुरंग भांडवलकर, अमित बर्डे, उद्धव दिंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपीस हत्यारासह ताब्यात घेतले. इतरांचे जीवित धोक्यात येईल अशी कृती करणे आणि भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस ताब्यात घेतले आहे, रिव्हॉल्वर आणि बुलेट (गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कौटुंबिक वादातून प्रांत कार्यालयासमोर झालेल्या या गोळीबार घटनेने खळबळ उडाली आहे.

COMMENTS