सीरमला मोठे यश प्राप्त; गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करणारी देशातील पहिली लस केली विकसित.

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

सीरमला मोठे यश प्राप्त; गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करणारी देशातील पहिली लस केली विकसित.

‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ नावाच्या घातक विषाणूमुळे गर्भाशयाचा कर्करोग उदभवतो.

पुणे : भारतातील लस विकसित करणारी संस्था सीरमला (Serum Institute) वैद्यकीय क्षेत्रातील असाध्य मानल्या जाणाऱ्या कर्करोगावर मात करण्यासाठी लस विकसित

एलॉन मस्क देणार ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा
चांद्रयान 3 vs लुना 25 चांद्रभूमीवर उतरण्याआधी दोन यानांमध्ये होणार टक्कर ?
दुचाकीच्या इंजिनचा वापर करत बनवली शेतीपूरक चारचाकी गाडी

पुणे : भारतातील लस विकसित करणारी संस्था सीरमला (Serum Institute) वैद्यकीय क्षेत्रातील असाध्य मानल्या जाणाऱ्या कर्करोगावर मात करण्यासाठी लस विकसित करण्यात यश प्राप्त झाले आहे. सिरमने स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुख भागाला होणाऱ्या कर्करोगावर मात करणारी गुणकारी लस नुकतीच विकसित केली आहे. ‘क्वाड्रिव्हॅलेंटह्युमन पॅपिलोमाव्हायरस’(Quadrivalenthuman papillomavirus) नामक लस पूर्णतः स्वदेशी बनावटीची असून, येत्या काही दिवसांतच ती बाजारात उपलब्ध होणार आहे. ही लस ‘सर्व्हावॅक’(Survavac) या नावाने ओळखली जाणार असून, स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कर्करोगावर ती प्रभावी ठरणार असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात स्त्रियांना होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोग्यांचे (Uterus Cancer Patient) प्रमाण मोठे असून या बाबतीत देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. मुख्यतः ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ (Human Papillomavirus) नावाच्या घातक विषाणूमुळे गर्भाशयाचा कर्करोग उदभवतो. भारतातील १५ ते ४४ या वयोगटातील महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. येत्या डिसेंबर २०२२ पर्यंत या लसीचे १ कोटी डोस निर्मित केल्या जाणार असून, याबाबत सिरमने केंद्र सरकारला अधिकृत माहिती दिली आहे. अतिशय उपयुक्त असणारी ही लस ९ ते १४ या वयोगटातील मुलींना दिली जाणार असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. एकंदरीतच सिरमने अतिशय जीवघेण्या मानल्या जाणाऱ्या आजारावर गुणकारी लस अगदी थोड्या वेळात निर्माण केल्याने त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. नुकतेच १२ जुलै रोजी लसीच्या उत्पादनास परवानगी मिळाल्यापासून आतापर्यंत सिरमने सातत्याने लस निर्मितीला प्राधान्य देऊन यशस्वीपणे देशी बनावटीची लस विकसित केल्याने, लवकरच देशातील स्त्रियांना आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS