Homeताज्या बातम्याशहरं

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

मुंबई प्रतिनिधी - सध्या छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. टीआरपीच्या कारणामुळे या मालिका बंद होताना दिसत आहेत. अश

संघप्रमुखांनी हिंदू बहुजनांना, अज्ञानाच्या गर्तेत लोटू नये !
सरपंचाच्या गाडीवर गोळीबार, सरपंच थोडक्यात बचावले | LOK News 24
Solapur : मंद्रुपच्या अप्पर तहसिलदार उज्ज्वला सोरटे यांची अखेर बदली

मुंबई प्रतिनिधी – सध्या छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. टीआरपीच्या कारणामुळे या मालिका बंद होताना दिसत आहेत. अशातच आता ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ लवकरच प्रेक्षकांची रजा घेणार आहे. बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेने १००० भागांचा टप्पा पूर्ण केला असून आज या मालिकेचे शेवटचे चित्रिकरण पार पडले. यानिमित्ताने संपूर्ण टीमने एकत्र येऊन हा क्षण साजरा केला. त्यासंबंधिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या मोरे कुटुंबीयांनी प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकून घेतली. अंजी, पशा, सूर्या, सुरू, वैभ्या, अवनी, ओंकार ही पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीमध्येही मालिका मागे नव्हती. मात्र कथा पूर्ण होत असल्यामुळे ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं म्हटलं जात आहे. आज मालिकेच्या शेवटच्या एपिसोडचे चित्रिकरण झाले. यासंदर्भात मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. ‘स्टार प्रवाह’ या इन्स्टाग्राम पेजवरूनही ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेच्या संपूर्ण टिमचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच लिहिलं आहे की, “लवकरच स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचे १००० भाग पूर्ण होत आहेत. या १००० भागांचा टप्पा पूर्ण करत मालिकेचा गोड शेवट होणार आहे. आज या चित्रिकरणाच्या शेवटच्या दिवसानिमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टिमने एकत्र येत हा क्षण साजरा केला. प्रेक्षकहो स्टार प्रवाहवरील मालिकांवरंचं तुमचं प्रेम असंच कायम ठेवा..खूप खूप धन्यवाद!” या व्हिडीओत कलाकार केक कापून शूटिंगचा शेवटचा दिवस साजरा करताना दिसत आहे. यावेळी अंजी अर्थात अभिनेत्री कोमल कुंभार हिला अश्रू अनावर झालेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान, ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेच्या जागी कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

COMMENTS