Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री संस्थेने गुणवत्तेचा लौकिक कायम जपला

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे प्रतिपादन

संगमनेर ः सह्याद्री विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी 99 टक्के निकाल लागला आहे. सह्याद्री संस्थेने गुणवत्तेने आपला लौ

वाळू तस्कराचा महसूल पथकातील तलाठ्यावर हल्ला
कोपरगावच्या रस्ते नुतनीकरणासाठी 80 लाखाच्या निविदा प्रसिद्ध ः आमदार काळे
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन

संगमनेर ः सह्याद्री विद्यालयाने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी 99 टक्के निकाल लागला आहे. सह्याद्री संस्थेने गुणवत्तेने आपला लौकिक कायम जपला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. सह्याद्री विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे साहेब, सहसेक्रेटरी दत्तात्रय चासकर सर, रजिस्ट्रार बाबुराव गवांदे सर, प्राचार्य के.जी. खेमनर, उपप्राचार्य जी.एम. डोखे, शिक्षक प्रतिनिधी प्रा.संतोष थोरात, प्रा. चित्रा  कुलकर्णी, पालक प्रतिनिधी गिरीश नेहे सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.तांबे म्हणाले कि, सह्याद्री विद्यालयाने सातत्याने गुणवत्तेची परंपरा जपली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर चारित्रसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्य या संस्थेत होत आहे. संगमनेर हे शिक्षणाचे माहेर घर ठरले असून दर्जेदार व गुणवत्तापूर्वक शिक्षण विविध संस्थांमधून मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हि मोठी संधी असून प्रत्येकाने आत्मविश्‍वासाने स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. जिद्दीने व प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास सर्व विद्यार्थ्यांना मोठे यश मिळणार असल्याचे ही ते म्हणाले. सायन्स शाखेचा निकाल 99 टक्के लागला असून तालुक्यात प्रथम क्रमांक आदिती भास्कर शिंदे तर प्लेन सायन्स मधून दुसरा क्रमांक मानसी गवांदे या विद्यार्थिनींनी पटकावला.कार्यक्रम प्रसंगी सायन्स कॉमर्स व आर्ट्स या तीनही शाखांमधील गुनानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सायन्स शाखेमधून आदिती शिंदे, मानसी गवांदे, साक्षी शिंदे, श्रुती वाकचौरे, वेदांत सागर तर कॉमर्स मध्ये प्रणव बुद्रुक, संस्कृती कुटे, पुजा वाघ, गौरी नेहे, साक्षी कानकाटे तर आर्ट्स मध्ये रत्नमाला शेवाळे, अविनाश समशेर,  प्राची आचट, अस्मिता वरपे, प्रगती खरात, अस्मिता उगले यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गणेश गुंजाळ व प्रा.नवनाथ गुंड यांनी केले तर आभार शिक्षिका प्रतिनिधी चित्रा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.शिक्षणमंत्री आ.बाळासाहेब थोरात,संस्थेचे अध्यक्ष मा. आ. डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे,सेक्रेटरी प्रतापराव मोरे काका,रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, मुख्याध्यापक अशोक गवांदे, उपमुख्याध्यापिका सौ.भुजबळ मॅडम,पर्यवेक्षक अशोक मेहेरे सर्व मार्गदर्शक शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले.   

COMMENTS