समाजमनावर झालेले संस्कार हेच आत्महत्येचे कारण!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

समाजमनावर झालेले संस्कार हेच आत्महत्येचे कारण!

नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे गेला दिवसही जागतिक आत्महत्या प्रतिबंध  दिन संबंधीत क्षेत्रातील मंडळींनी नेटकेपणाने साजरा केला.समाजाचे मानसिक स्वा

मोपलवार म्हणजे सत्ता-प्रशासानाचा नेक्सस !
कसबा-चिंचवड निकालाचा अन्वयार्थ !
आत्मक्लेष देणारे उपोषण सोडा; व्यवस्थेविरुद्ध लढूया !

नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे गेला दिवसही जागतिक आत्महत्या प्रतिबंध  दिन संबंधीत क्षेत्रातील मंडळींनी नेटकेपणाने साजरा केला.समाजाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे,त्यावर काय आणि कशा उपाय योजना करायला हव्यात यावर मंथन झाले.चर्चा झडल्या.हाती काय पडले, थोडक्यात समाजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी निर्णायक काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहीला.आत्महत्या करण्याचा विचार मनात का येतो किंबहूना कारणीभूत ठरलेली परिस्थिती कशी हाताळायची या मुद्यांचे निराकरण कधीच होत नाही.
दहा सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा रूढ झाली आहे,अलिकडच्या काळात डे संस्कृती एव्हढी बोकाळली आहे की प्रत्येक घटनेचा एक दिवस असा नोंद दिनदर्शिकेलाही घेणे भाग पडले  आहे.जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनही या जातकुळीत बसला आहे.खरे तर आपला भवताल अशा वैफल्यग्रस्त व्यक्तींनी पुरेपूर व्यापला आहे.प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणास्तव वैफल्यात जात असतो.निर समाधान मिळणारी एकही व्यक्ती या पृथ्वीतलावर अस्तित्वात नाही.तरीही प्रत्येक व्यक्ती आत्महत्येचा मार्ग चोखाळत नाही.त्याला त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कारणीभूत असते.मानवी जन्म सहजासहजी लाभत नाही असे अमुल्य जीवन इतक्या सहज संपविण्याचा विचार मनात का येत असावा? यावर समाजचिंतन होण्याची खरी आवश्यकता आहे.
गतिमान विज्ञान तत्रंज्ञानाच्या युगात दैनंदिन मानवी जीवन सुध्दा खुप गतिमान झाले आहे. आम्ही एवढे गतिमान झालो आहोत की आमच्या जवळ सर्व साधने उपलब्ध असतांना देखील आम्ही एक – दुसर्‍याकडे जावू शकत नाही. मैत्री, पारिपारिक संबंध, नात्यागोत्यातील प्रेमभाव काळाच्या प्रावाहात वाहून जाताना दिसतो आहे,परस्परांबद्दल  प्रेमभावना वाढीस लागण्याऐवजी द्वेषभावना आणि आकस वाढतो आहे. एकत्रित कुंटुंब पध्दत तर केंव्हाच काळाच्या उदरात गडप झाली आहे. त्रिकोनी किंवा चौकोनी कुटुंब पध्दती आस्तिवात आली आहे.त्यातही पती – पत्नी दोन्ही नोकरी करणारे असल्याने पारिवारिक संवाद देखील केंव्हाच संपला आहे. जो संवाद परिवारात होता, शेजार्‍या – पाजार्‍याशी होता, कौटुंबिक  नात्यागोत्यात होता, मित्र परिवारात होता तो आधी दुरदर्शन वरील विविध वाहिन्यांनी हिरावुन घेतला.त्यात आणखी भर घातली ती  प्रत्येक घरात प्रत्येकाच्या हातात असलेल्या   मोबाईलने गिळला आहे. दळणवळणाची  साधने नव्हती, मोबाईल नव्हते तेव्हा जे प्रेम होते, जो संवाद होता तो आज प्रत्येक घरात फोर व्हिलर आली, घराघरात मोबाईल पोहचल्याने  वाढण्याऐवजी कमी झाला आहे. प्रत्येक माणुस पैशामागे आणि भौतिक सुखामागे धावतो  आहे. करिअर,जॉब, इएमआयच्या   तणावात जगणारी महानगरे बकासुराप्रमाणे वाढत आहे. यातुन सुरु झाला  तो आर्थिक तणाव. हा आर्थिक तणाव नात्यांनाही शुद्र समजु लागल्याने आपसातील प्रेम संपत चालले आहे. आपल्या पतीच्या उत्पन्नावर आयुष्यभर काटकसरीने संसार करत मुलांवर संस्कार करणारी आई भौतिक सुखाच्या नादात संपली आहे. एक जबाबदार वडील ज्यांचेकडे पाहिल्यावर संपुर्ण कुंटुंबाला आभार वाटायचा ते ‘बाबा’ आता रात्री घरात पोहचतात जेव्हा मुले झोपी गेलीली असतात. काका, काकु, मावशी, मामा,मामी, मावस बहिण आत्या,ही नाती आणि या नात्यातील ओलावा कोरडा पडला आहे,    मामाचे गांव हरवले आहे. माय मरो मावशी जगो अशा मावशीचे प्रेमही  लुप्त झाले आहे. इतकेच काय नवरा बायकोमधंल प्रेम एकमेकांच्या कमाईवर तोलले जाऊ लागले आहे.,महामारीच्या  काळात आपली नोकरी गेल्याने  हजारो घरांमध्ये आर्थिक संकटेे आली. त्या वर्षभराच्या संकटाचा सामना करण्याची मानसिक शक्ती सुध्दा आता संपली असल्याने हजारो पती पत्नींचा काडीमोड होऊन कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. एकीकडे मृत्यू माणसाच्या किती जवळ आहे, असे चित्र दिसत असतांना पैशासाठी पती – पत्नीचं घट्ट नात्याची वीण विस्कटली आहे. पाल्यांना ‘नाही’  ऐकण्याचे संस्कार नाहीत. मोबाईल देण्यास  आई वडिलांनी नकार दिला म्हणुन अल्पवयीन  किशोरवयीन मुला मुलींची आत्महत्या.  अशा प्रकारच्या वृत्तांनी अगांवर शहारे  उभे राहतात.संतापही होतो.अतिशय हलाखिच्या आर्थिक परिस्थितीत जिद्दिने, चिकाटीने उभे राहणाचे संस्कार मुलांवर शाळेत तर होत नाहीतच परंतु घरादेखील आता होत नसल्याने मानसिक स्वास्थ पूर्ण पणे बिघडले आहे. सहन करण्याची शक्ती, संघर्ष करण्याची जिद्द, संयम, सामाजिक भान संपल्याने आता विद्यार्थी आत्महत्या करतो आहे. शेतीत पिकले नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो आहे. भावनिक नातं इतक नकली होत चालल आहे की नवरा बायको लहान – लहान क्षुल्लक कारणांवरुन विभक्त होत आहेत, कधी,पत्नी आत्महत्या करते आहे, तर कधी पती संतापाने पत्नीला मारहाण करतो आहे. असं म्हणतात की चौरांशी हजार जन्म घेतल्यावर मानवाचा जन्म मिळतो. इतक सुंदर शरीर, इतके मजबुत  हात – पाय,सुंदर जग पाहण्यासाठी दिलेले सुंदर डोळे, विचार करणार मन, तर्क करणारी बुध्दी ईश्वरानं  दिल्यानंतर  क्षणात भौतिक  सुखासाठी, काही मिळालं  नाही म्हणून, मानसिक रागातुन स्वतःला संपविण्याची कृती ही खर्‍या अर्थाने षंढ मनोवृत्तीचे लक्षण आहे. उलट षंढ माणसे आज आत्मविश्वासाने जगतांना दिसत आहेत.याच आठवडयात जपानमधील टोकिया शहरात जागतिक पराआलपिंक स्पर्धा संपल्या.  ज्या अपंग खेळांडुसाठी असतात. या स्पर्धांमध्ये भाग  घेणार्‍या खेळांडुची जगण्याची जिद्द आणि खेळात विजय मिळवण्याचा आत्मविश्वास पाहिला तर   कुणाच्याही मनात आत्महत्येचा विचार येणार नाही.कोणत्याही  मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची गरज उरणार नाही. सत्याच्या मार्गावर अपरिग्रह वृतीने, शरीरश्रम करण्याच्या जिद्दीने, आणि आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची ताकद ज्या पायामध्ये, ज्या मनगटामध्ये,ज्या मनामध्ये आहे त्यांनी कोणत्याही भविष्यवेत्याला  आपल्या हातावरच्या रेषा दाखविण्याची गरज नाही. या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी,पशुपक्षांची सुंदर किलबील ऐकण्यासाठी, फळे,फुलांचा आनंद घेण्यासाठी, समुद्राच्या लाटांची विशालता आणि अखंडता पाहण्यासाठी आणि निरभ्र आकाशातील लुकलुक करणार्‍या हजारो तारकांच्या पांढरा स्वच्छ उजेडात स्वप्नांच्या पूर्तीसाठी संकल्प करण्यासाठी जीवन हे अत्यंत महत्वपूर्ण आहे.हा संस्कार  मानवी मनावर बिंबवणे  हा खरा उपचार आहे.

COMMENTS