पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे खरीप पीक धोक्यात आले आहे. मुसळधार पा

पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे खरीप पीक धोक्यात आले आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. पावसामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील दोन दिवस पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यासोबत बुलडा जिल्ह्यात देखील पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. दरम्यान, बुलडणा-खामगाव – नागपूर या महामार्गावरील रोहना गावाजवळील रोहना नदीला पूर आला असून गेल्या काही तासापासून वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. त्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. या पावसाने तालुक्यातील पिकांचही मोठ नुकसान झाल आहे. तर अशीच काहीशी परिस्थिती गोंदिया जिल्ह्याची देखील आहे. सलग दुसर्या दिवशीही परतीच्या पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला होता. गोंदियातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज बुधवारी सलग दुसर्या दिवशी जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सध्या कापणीला आलेल्या धान पिकाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीकाचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरातील अनेक शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. तर आगामी काळात असाच पाऊस सुरु राहिला तर शेतकर्यांचे अर्थकारण कोलमडण्याची शक्यता अधिक बाळवली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. तर अशीच काहीशी परिस्थिती बीडच्या परळी तालुक्यातली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून तसेच मध्यरात्री झालेल्या पावसाने खरिपातील सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळीतील संगम येथे मध्यरात्री दमदार पाऊस झाला. याच पावसात काढणीला आलेले सोयाबीन पूर्णतः पाण्यात गेले आहे.
COMMENTS