Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलात्कार पीडितेने पोलिस ठाण्यातच केले विष प्राशन

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस ठाण्यातील घटना

चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस ठाण्यात एका बलात्कार पीडित महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्ह

शासकीय रुग्णालयांतील सुविधांचा आढावा घेणार
उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत सगळ्या गोष्टींचा खुलासा करू – नाना पटोले 
घरकाम करणार्‍या महिलांसाठी स्टार्ट अप

चंद्रपूर/प्रतिनिधी ः चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिस ठाण्यात एका बलात्कार पीडित महिलेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला. बलात्कार पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बलात्कार करणार्‍या आरोपीला जामीन मिळवून देण्यास मदत करणार्‍या पीएसआयवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलेने विष प्राशन केले.
 महिलेने आरोप केलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव निलेश चौरे असे आहे. बलात्कार केलेल्या आरोपीचे नाव इरफान शेख असे असून 36 वर्षीय पीडित महिलेनेऑक्टोबर 2022 मध्ये त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती. आरोपीवर 376 आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती. मात्र या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्याचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चौरे मदत करत असल्याचाआरोप देखील महिलेने केला होता. सहायक पोलिस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलेने वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली होती. मात्र तरीही आरोपीवर कोणतीही कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीसठाणे गाठून तेथेच विष घेतले. महिलेला प्रथमवरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS