ईश्वरपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्राच्या शिवाराती

ईश्वरपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कारखाना कार्यक्षेत्राच्या शिवारातील पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरण, जेसीबीने नाले खुदाई, वाडी-वस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नव्या बोअरची खुदाई, व्यायाम शाळांची दुरुस्ती आणि साहित्य पुरवठा आदी पावणे दोन कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. राजारामबापू साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी पुढाकार घेऊन या कामांना गती दिली असल्याने कारखाना कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजारामबापू साखर कारखान्याने संपूर्ण राज्यात सर्वाधिक 1300 बोअरची खुदाई करून त्यावर हातपंप बसविण्याचा विक्रम केला आहे.
राजारामबापू साखर कारखान्याचा राजारामबापू इंडोमेंट ट्रस्ट म्हणजे कारखान्याचे सभासद आणि ऊस उत्पादक शेतकर्यांच्यासाठी वरदानच ठरला आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू साखर कारखान्याने सातत्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कारखान्याचे सभासद व ऊस उत्पादक शेतकर्यांना हातभार लावणारे अनेक उपक्रम राबविले आहेत. मात्र मध्यंतरी काही तांत्रिक कारणांनी ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करणे बंद होते.
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी यातून मार्ग काढत पुन्हा ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जाणार्या विकास कामांना गती दिली आहे. त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकर्यांच्या मागणीवरून तब्बल 78 गावातील 91 पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण केले आहे. या रस्त्यांच्यावर 30 ब्रासपासून 100 ब्रास पर्यंत मुरूम टाकून हे पाणंद रस्ते दुरुस्त केले आहेत. याचा त्या-त्या शिवारातील शेतकर्यांना मोठा लाभ झाला आहे. तसेच कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील नाल्यांची जेसीबीने साफ सफाई केली आहे.

COMMENTS