Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवासादरम्यान सापडलेली पर्स केली परत

छाया रामचंद्र पेटारे यांचा प्रामाणिकपणाचे कौतुक

श्रीगोंदा प्रतिनिधी ः छाया रामचंद्र पेटारे यांचे पाहुणे श्री जालींदर विष्णू उल्हारे महाराज यांचेकडे घोगरगाव येथे जात असताना त्यांना पुणे नगर प्रव

कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी
प्रामाणिकपणा व इमानदारी हीच आदिवासी समाजाची कवच कुंडले ः पो.नि.देसले
काँग्रेस-भाजपमध्ये रंगला ऑक्सिजन श्रेयवाद ; शहरात झाला चर्चेचा विषय

श्रीगोंदा प्रतिनिधी ः छाया रामचंद्र पेटारे यांचे पाहुणे श्री जालींदर विष्णू उल्हारे महाराज यांचेकडे घोगरगाव येथे जात असताना त्यांना पुणे नगर प्रवासादरम्यान बस मध्ये त्यांना पर्स सापडली. त्या घोगरगावात पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्यांनी ती पाहुण्यांच्या हातात देत संपर्क करण्याचासाठी त्यात पत्ता कार्ड असे काही पाहण्यास सांगितले.
यावेळी पर्समध्ये असलेल्या मोबाईल वर फोन केला असता तो श्रीमहारुद्र चतुर किनगाव ता.सिंदखेड राजा जिल्हा जालना यांच्या पत्नीची असल्याचे समजले, असता त्यांचे अहमदनगर येथे पाहुणे असल्याचे सांगितले. मग श्री जालींदर विष्णू उल्हारे महाराज यांनी नगरमध्ये जाऊन त्यांचे पाहुणे प्रा.डॉ.दत्तात्रय लोडे विभाग प्रमुख कै.वै.पं.गंगाधरशास्त्री गुणे आ आयुर्वेद महाविद्यालय विश्रामबाग अहमदनगर यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी प्रा.डॉ. दत्तात्रय लोंढे यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यावेळी डॉ. लोडे, डॉ.काझी, जालींदर उल्हारे महाराज व सामाजिक कार्यकर्त ज्ञानदेव भैलुमे उपस्थित होते. घोगरगाव सह श्रीगोंदा तालुक्यातून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS