वाहनचोरी करणार्‍या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहनचोरी करणार्‍या चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसराती महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरुन नेली याप्रकरणी गुन्ह्या

राज्य सरकारने तृतिय पंथीयांना देखील मदत करावी – विक्रम राठोड
जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची वाटचाल सहा हजारांकडे
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरु

संगमनेर/प्रतिनिधी ः संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसराती महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरुन नेली याप्रकरणी गुन्ह्याचा तपास करताना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, संगमनेर पोलीसांच्या पथकाने या गुन्ह्यातील चोरांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एक पिकअप गाडी, तीन मोटार सायकल असा एकुण 8 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उपविभागीय पालीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. आण्णसाहेब दातीर, पोना. फुरकान शेख, पोकॉ. अमृत आढाव, पोकॉ. सुभाष बोडखे, पोकॉ. प्रमोद गाडेकर यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. विजय उर्फ सोनु रावसाहेब गुंजाळ, (वय 22 वर्षे रा. गुंजाळवाडी शिवार, वेल्हाळे रोड, संगमनेर) व अनिकेत उध्दव कडलग (वय 25 वर्षे, रा. वडगाव लांडगा रोड, जवळे कडलग, ता. संगमनेर) असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, 18 मार्च 2021 रोजी संगमनेर शहरातील नफिस अनिश पठाण रा. संगमनेर यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली नेहमीच्या ठिकाणी जोर्वे नाका, संगमनेर येथे लावलेली असताना कोणी तरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याबाबत दिलेल्या फिर्यादी वरुन संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. 164/2021 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आला होता. त्यानुसार प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार, गुंजाळवाडी शिवारातील विजय उर्फ सोनु रावसाहेब गुंजाळ व जवळे कडलग गावातील अनिकेत उध्दव कडलग यांनी संगमनेर शहरातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली चोरी केलेली असुन ट्रॅक्टर अनिकेत कडलग याचे घरा समोर लावलेला आहे. तसेच त्याने मोटार सायकल व पिकअप गाडीची चोरी केले असुन तो अशा प्रकारे चोरीचे गुन्हे करत आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पेलिसांनी दोन्ही संशयीत आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी चेरीची कबुली पोलिसांनी दिली.
संगमनेर शहरातुन एक महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली, पुणे येथुन तीन मोटार सायकल व एक पिकअप गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच आरोपीकडुन एक संशयीत लाल रंगाची तवेरा गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. त्यांचेकडे मिळुन आलेल्या मुद्देमालाचे एकूण किंमत 8 लाख 30 हजार इतकी आहे. सदर आरोपी हे संगमनेर शहर पोलीसांच्या ताब्यात दिले असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचे मार्गदर्शना खाली पोना. गजानन गायकवाड हे करत आहेत.

COMMENTS