Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ता खोदल्यामुळे नागरिकांचे होणारे हाल थांबवावे ः सोमवंशी

ड्रेनेज लाईन कामासाठी 10 महिन्यापासून रस्ता ठेवला खोदून

राहाता प्रतिनिधी ः ड्रेनेज लाईन कामासाठी 10 महिन्यापासुन रस्ता खोदल्यामुळे तसेच नागरीकांचे होणारे हाल थांबावे अशी मागणी शिवसेना उ.बा.ठा.चे राहाता

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा
अहमदनगर महाविद्यालयातील हिंदी विभागाने विविध ऑनलाईन कार्यक्रमाने केला हिंदी पंधरवाडा उत्साहात साजरा
नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज

राहाता प्रतिनिधी ः ड्रेनेज लाईन कामासाठी 10 महिन्यापासुन रस्ता खोदल्यामुळे तसेच नागरीकांचे होणारे हाल थांबावे अशी मागणी शिवसेना उ.बा.ठा.चे राहाता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांनी राहाता नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील माळी गल्ली प्रभाग क्र. 6 मध्ये ड्रेनेज लाईनचे काम करत असतांना खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती अपेक्षीत होती.या कामाचे टेंडर देतेवेळी त्यात रस्ता दुरुस्त करुन देणे बाबतची अट होती. परंतु 10 महिने उलटुन गेले तरी अद्याप सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सदरचा रस्ता हा पेवर ब्लॉकचा होता. रस्त्या दुरुस्त न केल्यामुळे आता ऐन पावसाळ्यात सदर रस्त्यावर चिखल साचणे, गाडी घसरणे, वृध्द माणसांना चालता न येणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्याची दुरावस्था ही वाडी वस्तीवरील रस्त्यासारखी झालेली आहे. टेंडरमधील अटी शर्तीचा भंग केल्या प्रकरणी ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही व्हावी व सदरचा रस्ता पुर्ववत करुन मिळावा ही विनंती प्रशासनास करण्यात आली आहे. तसेच येत्या आठ दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त न झाल्यास शिवसेना (उ.बा.ठा.) तर्फे आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर होणार्‍या परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी गणेश सोमवंशी राहाता सर प्रमुख शिवसेना (उ.बा.ठा.), अमोल खापटे,अतुल सोमवंशी आदी जण उपस्थित होते.

COMMENTS