Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांना एनडीएत आणण्याचा होता डाव

त्यासाठीच अजित पवार गटाने घेतल्या भेटी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकारणांचे पत्ते उलगडत असून, गेले दोन दिवस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटी अजित पवार गटाने घेतल्यामुळे

मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक
पक्ष आणि चिन्ह जावू देणार नाही
बंडखोरांनी माझा फोटो वापरू नये

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकारणांचे पत्ते उलगडत असून, गेले दोन दिवस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटी अजित पवार गटाने घेतल्यामुळे राज्यात राजकीय संभ्रम वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा काही भाग समोर येतांना दिसून येत आहे. त्यातील प्रमुख बाब म्हणजे शरद पवारांनाच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमध्ये आणण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न होता, त्यासाठी त्यांची मनधरणी या गटाकडून सुरू होती, असे समोर येत आहे.
राज्यात सरकार स्थिर होते, सरकार पडण्याची कोणतीही भीती नव्हती, असे असतांना अजित पवार भाजपच्या वळचणीला का गेले ? असा सवालही केला जात आहे. अजित पवार यांच्या बंडाचे नेमके कारण आता समोर आले आहे. अजित पवार हे दिवाळीनंतर बंड करणार होते. पण त्यांना आताच राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास सांगितले गेले. त्यामुळे अजित पवार आणि त्यांचा गट घाईने भाजपच्या बाजूला गेल्याचे सांगितले जात आहे. हे असे का झाले? त्याचे कारणही समोर आले असून आहे. अजित पवार यांचे बंड दिवाळीनंतर होणार होते. पण ते वेळेआधीच करण्यात आले. कारण राज्यात बर्‍याच राजकीय घडामोडी घडत होत्या. महाविकास आघाडीच्या राज्यात वज्रमूठ सभा सुरू होत्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. मविआला जनतेतून सहानुभूती होती. या सभा गर्दीच खेचत नव्हत्या तर त्याची चर्चाही सुरू होती. त्यामुळेच अजित पवार यांना वेळेआधी बंड करण्यास सांगण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. भाजप हायकमांड आणि संघाकडून दिवाळीनंतर अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय झाला होता, अशी माहितीही समोर आली आहे.

एनडीएच्या बैठकीसाठी दोन दिवस मनधरणी – शरद पवारांची वैचारिक बैठक पक्की आहे, त्यामुळे ते भाजपसोबत जातील याची अजिबात शक्यता नाही. मात्र शरद पवार गटाकडून त्यांना भाजपसोबत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवस सलग भेटीत आम्ही चुकलो, माफ करा हा उद्देश या बैठकीचा नव्हता, तर शरद पवार यांना एनडीएत आणण्याचा यामागे प्लान होता. शरद पवार यांनी बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला न जाता दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहावे म्हणून त्यांना आग्रह करण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट शरद पवार यांना भेटायला गेला होता, अशी माहिती समोर येत आहे. शरद पवार यांना एनडीएच्या बैठकीला येण्याचा अनऑफिशियल निमंत्रण देण्यात आले होते. तर पवार यांना एनडीएच्या बैठकीला आणण्याचा संपूर्ण प्लान अजित पवार गटाचा होता. त्यामुळेच शरद पवार यांची दोन दिवस मनधरणी करण्यात आली. आदल्या दिवशी मंत्र्यांनी विनंती केली. दुसर्‍या दिवशी आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली. शरद पवार यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता.

COMMENTS