पुणे : महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षेच्या फेलोशिपचा बुधवारी पुण्यातील विविध केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान सिंहगड टेक्

पुणे : महाज्योती, सारथी आणि बार्टी परीक्षेच्या फेलोशिपचा बुधवारी पुण्यातील विविध केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कासाबाई नवले कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये महाज्योती, बार्टी चाचणी परीक्षेत विद्यार्थीना सील नसेलेले पेपर दिले गेले. पुण्याबरोबरच नागपुरातही पेपर फुटीचे प्रकरण समोर आले आहे.
परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना सील नसलेले आणि झेरॉक्स असलेले प्रश्नसंच वितरित करण्यात आले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यातील विविध परिक्षा केंद्रावर सुरू असलेल्या या परीक्षेवर बहिष्कार टाकला. दरम्यान, आही परिक्षाच देत राहू की संशोधन करु, अशा संतप्त सवाल करत आम्हाला सरसकट फेलोशिप द्या अशी मागणी देखील विद्यार्थ्यानी यावेळी केली. सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांची संशोधन अधिछात्रवृत्ती (पीएच.डी.फेलोशीप) मिळविण्यासाठी बुधवारी पुण्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या सावित्री बाई फुले सेट विभागाने ही परीक्षा आयोजित केली होती. दरम्यान, वडगाव येथील केंद्रावर मुलांना हा पेपर सील पॅक न देता झेरॉक्स कॉपी दिली गेली. यामुळे हा पेपर फुटला असल्याचे निष्पन्न झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकत परीक्षा केंद्रातून बाहेर पडले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्यातर्फे देण्यात येणार्या संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी पात्रता परीक्षा ही या पूर्वी 24 डिसेंबरला घेण्यात आली होती.
COMMENTS