अहिल्यानगर : भारतीय लोकशाही बळकट आणि मजबुतीकरण करण्याच्या उद्देशाने 73 व्या घटनेच्या अनुषंगाने त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली. जिल्हा स्तरावर जिल
अहिल्यानगर : भारतीय लोकशाही बळकट आणि मजबुतीकरण करण्याच्या उद्देशाने 73 व्या घटनेच्या अनुषंगाने त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती, गाव स्तरावर ग्रामपंचायत स्थापन करून सत्तेचे विकेंद्रीकर्ण केले गेले हि पंचायत राज व्यवस्था लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्याचा सुवर्णमध्य असल्याचा प्रतिपादनजिल्हा परिषद अहिल्यानगर येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री. राहुल शेळके यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात राष्ट्रीय पंचायतराज दिवस समारंभात केले ते अध्यक्ष स्थानावरून बोलेत होते. समारंभाचे उदघाटन प्रमुख मान्यवराच्या हस्ते दीपप्रजोलन करण्यात आले तर महात्मा गांधीयांच्या प्रतिमेचे पूजन करून शुभारंभ झाला. राज्यगीतानंतर जम्मू काश्मीर पहलगाम येथील दहशतवादी हल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय पंचायतराज दिनाच्या निमित्ताने पंचायतराज व्यवस्था या विषयावर यशदा, पुणे येथील प्रवीण प्रशिक्षक – अशोक सब्बन यांनी विस्तृतमार्गदर्शन केले. त्यात पंचायतराज व्यवस्थेची सुरवात ते लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कामाचा आढावा घेतला समारंभा प्रसंगी मा. पंतप्रधान – नरेंद्र मोदीजी यांनी देशवासी यांच्याशी थेट प्रक्षेपणद्वारे दाखविण्यात आला त्याचा लाभ सर्व अधिकारी कर्मचारी यांनी घेतला. राष्ट्रीय पंचायतराज दिन समारंभासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी – शैलेश मोरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी – श्री. देविदास कोकाटे, महिला व बालकल्याण विभागाचे – मनोज ससे, कृषी अधिकारी – सुधीर शिंदे, जिल्हा पशुधन अधिकारी – दशरथ दिघे, गट विकास अधिकारी -सुभाष सातपुते, यांच्या सह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय उरमुडे यांनी प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे सहा. गट विकास अधिकारी – भगवान बच्छाव यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी – मधुकर जाधव यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय औटी, महेश आढाव, कुमार सोनवणे, बिपीन चव्हाण, संतोष लोंढे, सीता सबलास, प्रतीक्षा फटांगरे, माही जोशी, शितल चौधरी, उद्धव शिंदे, प्रियंका सौदे, अमोल राऊत, महेंद्र आंधळे, अमोल गोसावी, रमेश पंडित, शालन राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित राष्ट्रीय पंचायतराज दिवस समारंभाचे उदघाटन करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) राहुल शेळके, जिल्हा पशुधन अधिकारी – दशरथ दिघे, कृषी विकाष अधिकारी – सुधीर शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी – देविदासकोकाटे, सहा. गट विकास अधिकारी – भगवान बच्छाव व इतर मान्यवर
COMMENTS