नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी : माजी आमदार कळमकर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी : माजी आमदार कळमकर

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रगत व मोठ्या शहरांच्या मानाने नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी आहे, अशी ख़ंत माजी आमदार दादा कळमकर यांनी बुधवारी व्यक्त के

विशेष मोक्का न्यायालयाने केली दोघांच्या पोलिस कोठडीत वाढ
शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयात सुसज्ज मशिनरीचे आगमन

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रगत व मोठ्या शहरांच्या मानाने नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी आहे, अशी ख़ंत माजी आमदार दादा कळमकर यांनी बुधवारी व्यक्त केली. नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
माजी आमदार कळमकर यांनी बुधवारी 78 व्या वर्षात पदार्पण केले.

यानिमित्ताने त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. शिवसेनेच्यावतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बुरुडे, नगरसेवक मदन आढाव यांनी त्यांचा सत्कार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संजय सपकाळ, अशोक बाबर, आण्णा दिघे आदींनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे, विजय वडागळे यांनीही सत्कार केला. यावेळी अभिजित सपकाळ, यशवंत कदम, संपत बेरड, विश्‍वनाथ बेरड, फारुख रंगरेज, हिरालाल लाखारा, शाकीर शेख, शिवसेनेचे रवी वाकळे, राहुल वाकळे, अभिजित बोरुडे व माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कळमकर म्हणाले, नगर शहर आज विकासाच्या वाटेवर आहे. अनेक मोठी विकासकामे शहरात होत असल्याचा आनंद होत आहे. मात्र इतर प्रगत व मोठ्या शहरांच्या मानाने नगर शहराचा प्रगतीचा व विकासाचा वेग कमी आहे. हा वेग वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाहेर काढून एकत्रित प्रयत्न करावेत. राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस एकत्र येत राज्याच्या विकासासाठी भरीव योगदान देत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी आवर्जून केले.

COMMENTS