नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथी चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या संघर्षाच्या मुद्यावरून विरोधकांनी बुधवारी लोकसभेत गोंधळ घातला. त्यानंत
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग येथी चीन आणि भारतीय सैन्यात झालेल्या संघर्षाच्या मुद्यावरून विरोधकांनी बुधवारी लोकसभेत गोंधळ घातला. त्यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात विरोधकांनी सभात्याग केला. भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी होती.
लोकसभेत काल बुधवारी प्रश्नोत्तराचा तास संपताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी केली. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये लोकसभेत भारत-चीन युद्धावर चर्चा करण्यास परवानगी दिली होती. ते म्हणाले की, आम्ही भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चेची मागणी करत आहोत. जवाहरलाल नेहरूंनी त्याकाळी 165 खासदारांना या सभागृहात बोलण्याची संधी दिली. यानंतर आपण काय करायचे ते ठरले. अधीर रंजन चौधरी यांच्या मागणीला उत्तर देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काँग्रेस आणि टीएमसीने निषेधार्थ सभात्याग केला आणि भारत-चीन सीमा मुद्द्यावर चर्चा होऊ न दिल्याचा आरोप सरकारवर केला. टीएमसी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही सभागृहात चर्चेची मागणी केली. यापूर्वी मंगळवारी देखील विरोधी पक्षांच्या खासदारांनी विविध मुद्यांच्या निषेधार्थ लोकसभेतून सभात्याग केला होता. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या खासदारांना काही मुद्दे उपस्थित करायचे होते. यावर लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असून तो तुमच्यासाठीच आहे. यानंतर ही विरोधी पक्षाचे खासदार आपले मुद्दे उपस्थित करण्याचे प्रयत्न करत होते. यानंतर काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्ससह अन्य पक्षांच्या खासदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभात्याग केला.
COMMENTS