आयुष्य ज्याच्या त्रासात काढले…मृत्यूनंतर त्यालाच कामाला लावले…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आयुष्य ज्याच्या त्रासात काढले…मृत्यूनंतर त्यालाच कामाला लावले…

अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव परिसरात राहणार्‍या 60 वर्षीय महिलेने सर्व आयुष्य पतीच्या जाचात काढले. मात्र मृत्यूनंतर तिने पतीच्यामागे कायद्याची झंझट लाव

शनिवारी भरणार राज्यातील पहिली मैदानी लोकशाळा
Ahmednagar : शहरात गुंडाराज… दहा जणांच्या टोळक्याचा धुडगूस… चाकूने मारण्याचा प्रयत्न… (Video)
 देवळाली प्रवरा येथे आदिवासी सन्मान मेळावा उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : केडगाव परिसरात राहणार्‍या 60 वर्षीय महिलेने सर्व आयुष्य पतीच्या जाचात काढले. मात्र मृत्यूनंतर तिने पतीच्यामागे कायद्याची झंझट लावून त्यालाच कामासच लावून अनोखा बदला घेण्याची घटना घडली आहे. हा परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. याबाबतची माहिती अशी की केडगाव परिसरातील एका 60 वर्षीय मीना सुरेश भालेराव (राहणार दूधसागर सोसायटी,केडगाव) या महिलेने राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद झाली. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार सोनवणे करीत आहे.
मृत महिलेचे शवविच्छेदन करीत असताना वैद्यकीय अधिकार्‍यांना महिलेच्या मृतदेहाजवळ दोन चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यांनी त्या चिठ्ठ्या पाकिटात बंद करून अन्य कागदपत्रांसह पोलिसांच्या ताब्यात दिल्या. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चिठ्ठ्या पंचासमक्ष उघडून पाहिल्या असता एका चिठ्ठीत लिहिले होते की, नवर्‍याने त्रास दिलेला आहे आहे, त्यामुळे जीवनाचा कंटाळा आला. आज वय साठ आहे. माझे लग्न सोळाव्या वर्षी झाले आहे. तेव्हापासून नवर्‍याचा खूप त्रास होता. तू नेहमी मरुन जा, मी कुणाला भीत नाही, असे बोलून त्रास देत द्यायचा. तर, दुसर्‍या चिठ्ठीमध्ये नवर्‍याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, तीन मुलांपैकी एक मुलगा मरण पावल्याने खूप दुःख झाले तरी पतीने खूप त्रास दिला, असे लिहिलेले आढळून आले. यावर कोतवाली पोलिसांनी सुरेश शंकर भालेराव (राहणार दूध सागर सोसायटी, केडगाव) यांच्याविरुद्ध त्यांची दोन मुले नरेश व महेश यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले, परंतु दोन्ही मुलांनी वडिलांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने कोतवाली पोलिस कर्मचारी राजू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूचा केलेल्या नोंदी भारतीय दंड विधान कलम 306 नुसार वृद्ध महिलेचा पती सुरेश शंकर भालेराव याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.

COMMENTS