Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कपाटाची चावी बनवून देणाराने दोन तोळ्याचे दागिने नेले चोरून

अहमदनगर प्रतिनिधी - कपाटाला नवीन चावी बनवून देणार्‍याने महिलेची नजर चुकवून कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. नेप्ती रोडवरील एकनाथनगरम

संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्सव उत्साहात
शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच
विठू नामाच्या गजरात धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात

अहमदनगर प्रतिनिधी – कपाटाला नवीन चावी बनवून देणार्‍याने महिलेची नजर चुकवून कपाटातील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. नेप्ती रोडवरील एकनाथनगरमध्ये शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनुराधा सचिन पवार (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील कपाटामध्ये 11 ग्रॅमचे नॅकलेस, पाच ग्रॅमची अंगठी, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र असे दोन तोळे एक ग्रॅमचे दागिने ठेवलेले होते. मात्र, त्यांच्या या कपाटाची चावी हरवली होती. शनिवारी फिर्यादी यांच्या गल्लीत चावी बनविणारा आला होता. त्यांनी त्याला कपाटाची नवीन चावी बनविण्यासाठी घरात नेले. त्याने चावी तर बनवली नाही, परंतु कपाटात ठेवलेले दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. फिर्यादी यांना शंका आल्याने त्यांनी पकडीने कपाटाचा लॉक उघडला असता त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चावी बनवून देणाराचा शोध सुरू केला आहे.

COMMENTS