श्रीरामपूर ः हरेगाव, उंदीरगाव येथील दाजी भजेवाले परदेशी परिवाराने आमच्या अनाथ मुलांच्या मुखी घासभर आवडते अन्न दिले, देतो तो देव हीच आपली श्रद्धास

श्रीरामपूर ः हरेगाव, उंदीरगाव येथील दाजी भजेवाले परदेशी परिवाराने आमच्या अनाथ मुलांच्या मुखी घासभर आवडते अन्न दिले, देतो तो देव हीच आपली श्रद्धासंस्कृती आहे, ती जपणाऱे संजय परदेशी आणि त्यांचा परिवार हा संतवृत्तीचाच असल्याचे मत गोखलेवाडी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष ह.भ.प.कृष्णानंद महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जवळील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमामध्ये संजय परदेशी आणि दाजी भजेवाले परिवाराने आश्रमातील अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ देऊन आपले वडील रामसिंग मगनसिंग परदेशी, आई सुमनताई परदेशी यांच्या दानशूरपणाच्या, गोरगरिबांना मदत करण्याच्या स्मृती आठवणी सांगत डॉ. उपाध्ये यांना त्यांच्या निराधार, अनाथ अवस्थेत कसा कौटुंबिक आधार दिला ते प्रसंग सांगितले. कृष्णानंद महाराजांच्या सेवाकार्याचे कौतुक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये हे आमचे मामा असल्याचे सांगितल्यावर कृष्णानंद महाराज यांनी आनंद व्यक्त करीत आपल्या पाच वर्षांपासूनच्या कार्याची माहिती दिली. पत्रकार राजेंद्र देसाई, डॉ. बाबुराव उपाध्ये, मेजर नंदकुमार सैंदोरे, नितीन जोर्वेकर, मंदाकिनी उपाध्ये आदिंच्या देणगी आणि उपक्रमाचे प्रसंग सांगितले. अशा अनेकांच्या सहकार्यातून हे देवाचे कार्य पुढे जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आभार मानले.
COMMENTS