Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुढील महापौर शिवसेनेचाच! -उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्‍वास

तरोड्यातील शिवसेनेचा नगरसेवक नांदेडचा महापौर होणार ः आ. बालाजी कल्याणकर यांचा दावानांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा महापौ

आरक्षणाच्या नावाखाली खंडणीचा खेळ?
नांदेड मनपामध्ये भाजपचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी
मानधन, सन्मान आणि न्याय मिळेपर्यंत नोटा हाच पर्याय

तरोड्यातील शिवसेनेचा नगरसेवक नांदेडचा महापौर होणार ः आ. बालाजी कल्याणकर यांचा दावा
नांदेड : नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेचा महापौर निश्‍चित होणार असून, इतक्या संख्याबळाने शिवसेनेचे नगरसेवक निवडून दिले जातील की महापौर ठरवताना शिवसेनेला विश्‍वासात घ्यावेच लागेल, असा ठाम विश्‍वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या माध्यमातून नांदेडमधील करपलेली विकासाची भाकरी पुन्हा फिरवायची असून, महापालिकेत विकासाभिमुख सत्तेची स्थापना करायची आहे, असे ते म्हणाले.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिंदे शिवसेनेच्या 40 उमेदवारांच्या प्रचारार्थ तरोडा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर, शिवउद्योग समूहाच्या अध्यक्षा  संध्याताई कल्याणकर, जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, उमेश मुंडे, मंगेश कदम, नारायण कदम, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अपर्णाताई नेरलकर, एकनाथ कल्याणकर, सुहास कल्याणकर, योगेश मुंडे यांच्यासह सर्व 40 उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनता पूर्वीही माझ्या पाठीशी होती आणि पुढेही राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात जेवढा विकास निधी या भागात खर्च झाला नाही, तेवढा निधी शिवसेनेच्या काळात मिळाल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तरोडा स्मार्ट करू अशी वक्तव्ये करणार्‍यांनी तरोडा चिखलात ठेवला होता, मात्र शिवसेनेचा आमदार झाल्यानंतर आम्ही तरोडा चिखलातून बाहेर काढत तब्बल 80 कोटींची विकासकामे केली, असे त्यांनी नमूद केले. नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाला मागील 50 वर्षांमध्ये आमदारांचा विकासनिधी कधी माहित झाला नव्हता. नांदेड उत्तर मतदारसंघात बाहेरच्या आमदारांची लुडबुड सुरू असून, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असताना अपक्षांचा प्रचार केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेचा नगरसेवक असताना टाकलेले आरक्षण आणि विकास आराखडा रद्द करण्यासाठी केलेला संघर्ष, आत्मदहनाचा प्रयत्न आणि नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्यामुळे डीपी प्लॅन रद्द झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. तरोडा भागातूनच नांदेडचा शिवसेनेचा महापौर होईल, असा ठाम दावा करत 3 हजार घरकुलांच्या कामांचा उल्लेख त्यांनी केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार कल्याणकर यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, सामान्य कुटुंबातील कामगाराचा मुलगा नगरसेवक होऊन सलग दोन टर्म आमदार होतो, ही बाब शिवसेना व नांदेडसाठी भूषणावह असल्याचे सांगितले. महानगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार बालाजी कल्याणकर एकटे पडलेले नसून त्यांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व शिवसेनेचे संपूर्ण मंत्री, आमदार पाठीशी आहेत. महापालिकेत सत्ता नसतानाही तरोड्यात 80 कोटी आणि नांदेड उत्तरमध्ये अडीच हजार कोटींची विकासकामे झाली. त्यामुळे महापालिकेची सत्ता शिवसेनेच्या हाती दिल्यास हजारो कोटींचा निधी नांदेडच्या विकासासाठी दिला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात दिल्यास हजारो कोटींचा निधी महापालिकेला देण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

COMMENTS