भविष्याचा नवा कर्तव्यपथ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भविष्याचा नवा कर्तव्यपथ

खरंतर आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झालो असलो, तरी अनेक बाबी आजही देशात टिकून आहे. ज्या सातत्याने ब्रिटिशांनी ओळख देतात. मग

वेळकाढूपणामुळेच आजची परिस्थिती
अन्यायाचा इव्हेंट किती दिवस ?
राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांची चाचपणी

खरंतर आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून स्वतंत्र झालो असलो, तरी अनेक बाबी आजही देशात टिकून आहे. ज्या सातत्याने ब्रिटिशांनी ओळख देतात. मग ती नावे असतील, अनेक ठिकाणे, ऐतिहासिक बाबी या ब्रिटिशांची साक्ष आजही देतात. मात्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांना, या बाबी बदलांचे स्मरण आपल्याला होत नसेल, तर आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीकडे कसे बघतो, हेच यातून अधोरेखित होते. स्वतंत्र झाल्यानंतर भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक देश बनला. त्यानंतर तर देशाने ज्या वेगाने काही निर्णय घ्यायला पाहिजे होते, ते घेतले नाही. भारतामध्ये मवाळ आणि जहाल जसे गट होते, तसेच काही ब्रिटिशांचे लांगुलचालन करणारे होते, ते काही त्यांच्याविरोधात उघड भूमिका घेणारे होते. त्यामुळे ब्रिटिशांचा हँगओव्हर उतरायला उशीर झाला असला, तरी इतका नक्कीच नको होता. भारतावर इंग्रजांनी राज्य केले असले तरी, आता आपण स्वतंत्र असून, अर्थव्यवस्थेत देखील मोठी झेप घेत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपण उदयास येत आहे. हा संघर्ष, ही प्रगती केवळ 75 वर्षांत भारताने साध्य केले आहे. त्यामुळे गुलामगिरीची मानसिकता मानसाला नेहमीच पंगु बनवते, अपंग बनवते. त्यामुळे ही मानसिकता उखडून फेकण्याची खरी गरज आहे. आपण स्वतंत्र असून, आपला विकास आपण करू शकतो. त्यामुळे गुलामगिरीचे हे जोखड फेकून देण्याची गरज होती. त्याचप्रकारे राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते इंडिया गेटदरम्यानच्या 3.2 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग ब्रिटिशांच्या काळात कर्तव्य पथ किंग्सवेने जॉर्ज पंचम यांच्या सन्मानासाठी बांधला होता. किंग्सवेचे नाव बदलून त्यानंतर राजपथ असे ठेवण्यात आले होते. आता राजपथाचे नाव बदलून ते कर्तव्यपथ असे करण्यात आले आहे. इंडिया गेट शेजारी उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच ग्रॅनाइटच्या भव्य प्रतिमेचे पंतप्रधान मोदी यांनी अनावरण केले आहे. यातून आम्हाला स्वतंःचे पथ, प्रतीक, लक्ष्य आणि संकल्प असतील. ही सुरुवात असून, आम्ही भूतकाळाला गाडून वर्तमानात जगतांना भविष्यातील चित्रांमध्ये नवे रंग भरत आहोत. येथे नव्या भारताच्या आत्मविश्‍वासाची बीजे रोवली आहेत. ही बीजे उत्तररित्या उगवून येत आहे. त्याला फळे, फुले येणार आहेत. या बीजाचे नवे वृक्ष होणार असून, ते आम्हाला सावली देणार आहे. ही नवी सुरूवात आहे. आणि नव्या सुरुवातीला सामौरे जातांना, भूतकाळातील गडद अंधार गाडून टाकण्याची गरज आहे. त्याच्या खाणा-खुना कुठे दिसत असतील, तर त्याला गाडायला पाहिजे. त्या आठवणी गाडून, त्याच्यावर ठामपणे उभे राहून उद्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवता आली पाहिजे. नुसती स्वप्नेच रंगवता नाही आली पाहिजे, तर त्या दृष्टीने आपल्याला कृती करता आली पाहिजे. नवनिर्मिती करता आली पाहिजे, तेही आपली सजृनशीलता जपून. त्यामुळे राजपथाला गाडून भविष्याचा कर्तव्यपथ आपल्याला नवी साद घालतांना दिसून येत आहे. तो नवी स्वप्ने आपल्याला दाखवतो आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशामध्ये नवे सरकार अस्तित्वात येत असली, तरी आपली लोकशाही दिमाखात उभी आहे. तिच्यावर अनेक संकटे आली, अनेक वार झाले, तरी ती भारताचा इतिहास, भविष्य घेऊन ताठ मानेने उभी आहे. त्यामुळे गुलामगिरीचे प्रतीके आपल्याला मोडीत काढून, भविष्याची उज्जल भारतांची स्वप्ने फुलवावी लागणार आहे. राजपथ केवळ दिल्लीतच नव्हे तर देशभरात असे अनेक पथ, प्रतीके, चिन्हे, नावे आहेत. ते बदलाची मोहीम आपल्याला सुरु करावी लागणार आहे.

COMMENTS