Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँगे्रसला बसणार पुन्हा धक्के

तीन आमदार अजित पवार गटामध्ये जाणार ः मंत्री आत्राम

नागपूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर या पक्षातील पुन्हा एकदा तीन आमदार अजित पवार गटामध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवा

नदीपात्रात आढळलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले
कोव्हॅक्सिनला जागतिक मान्यता नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले ! एकंदरीत सगळीच गंमत आहे
जुनी पेन्शन योजना लागू करा – मा. आ. डॉ. सुधीर तांबे

नागपूर/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर या पक्षातील पुन्हा एकदा तीन आमदार अजित पवार गटामध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा फूट पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
अजित पवार यांनी पक्षबांधणीसाठी लक्ष केंद्रीत केले असून, जास्तीत जास्त आमदार आपल्यासोबत राहण्यासाठी अजित पवार अनुकूल आहेत. त्यामुळे ते तीन आमदार कोण अशी चर्चा आता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये रंगतांना दिसून येत आहे. माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, शरद पवार गटाचे आणखी 3 आमदार आमच्या गटात येतील. तूर्त आम्हाला 45 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात लवकरच 3 आमदारांची भर पडून आकडा 48 वर पोहोचेल. आमच्या पक्षात येणार्‍या नेत्यांची मी नावे सांगणार नाहीत. पण ते येणार हे नक्की आहे. ते विकासासाठी आमच्याकडे येत आहेत. त्यांना विकास कामांसाठी निधीही मिळत आहे, असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. अजित पवार गटाने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी पक्षबांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांनाही मैदानात उतरवले आहे. त्यानुसार आत्राम विदर्भाच्या दौर्‍यावर आलेत. ते पक्षबांधणी, सदस्य नोंदणी, नव्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीसंबंधी यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूरच्या दौर्‍यावर आलेत. यावेळी त्यांनी आपण गडचिरोली मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचीही घोषणा केली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राजेश टोपे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चेवर भाष्य केले. ते म्हणाले की, राजेश टोपे अजित पवार गटाकडे जाणार ही फक्त चर्चा आहे. 2 महिन्यांच्या विलंबाने ते भूमिका का घेत आहेत? त्यांनी तशी भूमिका घेतली तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल असे म्हटले आहे. यापूर्वी देखील जयंत पाटीलच अजित पवार गटासोबत जाणार असल्याच्या चर्चांनी वेग धरला होता. त्यांना जलसंधारण खाते देणार असल्याची चर्चा देखील होती, मात्र जयंत पाटील यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिल्यामुळे आत्राम यांनी दावा केल्यानुसार ते तीन आमदार कधी अजित पवार गटासोबत जातात, ते आगामी काही दिवसात स्पष्ट होईलच.

COMMENTS