Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नॅशनल इन्स्टिट्यूट हा परसोनेल मॅनेजमेंट राष्ट्रीय निवडणूक अधिकारी” म्हणून  नाशिकचे एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांची निवड

नाशिक:  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोनेल मॅनेजमेंट (निपम)  ची २०२३ - २०२५  या द्वैवार्षिक निवडणुका राष्ट्रीय पातळीवर होत आहेत.  या निवडणुकीचे निवडणू

खिर्डी गणेश ते येसगाव रस्त्याची लोकवर्गणीतून दुरुस्ती
शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये आंदोलन
आ. तांबे यांची स्टेअर्स महाराष्ट्र गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड

नाशिक:  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोनेल मॅनेजमेंट (निपम)  ची २०२३ – २०२५  या द्वैवार्षिक निवडणुका राष्ट्रीय पातळीवर होत आहेत.  या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून नाशिकचे एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. निपम ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी संस्था एच. आर. मध्ये काम करते.  भारतात एकंदरीत ५३ शाखा आहेत. दर दोन वर्षांनी निवडणुका होतात. निपमचे मुख्य ऑफिस कोलकाता येथे आहे. नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक चेन्नई येथे संपन्न झाली. त्या ठिकाणी नाशिकचे राष्ट्रीय विशेष निमंत्रित एडवोकेट श्रीधर व्यवहारे यांची “राष्ट्रीय निवडणूक अधिकारी” या पदावर नेमणूक करण्यात आली. यानिमित्ताने नाशिकला प्रथमच संधी प्राप्त झाली आहे. व नाशिकला सन्मान प्राप्त झाला आहे.कोची-केरळ येथील राष्ट्रीय मुख्य निवडणूक अधिकारी श्री. पी.  प्रेमचंद  आणि दिल्ली येथील श्री. संजय वाधवानी   (ओएनजीसी चे माजी कार्यकारी संचालक) आणि नाशिकचे एडवोकेट श्रीधर व्यवहारे अशी त्री-सदस्य निवडणूक समिती स्थापन झाली आहे. नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीचा कालावधी २०२३ते २०२५असणार आहे. असे एडवोकेट यांनी सांगितले एडवोकेट श्रीधर व्यवहारे हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राष्ट्रीय कार्यकारणी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांना NIPM राष्ट्रीय “लाईफ टाईम फेलोशिप अवॉर्ड” सुद्धा मिळालेला आहे. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विविध कॉन्फरन्सेस आणि सेमिनार मध्ये सहभाग करण्याची संधी प्राप्त झाली आहे . नेमणुकीमुळे हा नाशिकला मिळालेला एक मोठा सन्मान आणि संधी पण आहे. औद्योगिक क्षेत्रातील पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर मधील ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजर्स, कामगार कायदा, परसोनेल मॅनेजमेंट या क्षेत्रातील विविध प्रोफेशनल सदस्य आहेत. निपम ही संस्था आंतरराष्ट्रीय लेव्हलला काम करत असते. एडवोकेट श्रीधर व्यवहारे हे सध्या ” निमा” नाशिकचे विश्वस्त आणि कार्यकारी समिती सदस्य आहेत.  या निवडीबद्दल नाशिक निपम मध्ये नाशिकच्या माजी NIPM अध्यक्षांना व माझी राष्ट्रीय सहसरचिटणीस एडवोकेट श्रीधर व्यवहारे निवडणूक अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या या निवडीचे स्वागत व अभिनंदन नाशिक NIPM शाखेचे अध्यक्ष प्रकाश बारी, सरचिटणीस हेमंत राख, उपाध्यक्ष राजाराम कासार व राहुल बोरसे खजिनदार, विनायक पाटील, सहसचिव प्रकाश गुंजाळ, कार्यकारणी सदस्य राजेंद्र आचारी, तुषार मोमीन ,सुस्मित दळवी, मनोज मुळे, रमेश गवळी आदींनी, तसेच  NIPM चे माजी अध्यक्ष DR.उदय खरोटे एडवोकेट श्रावण खैरनार, विश्वनाथ डांगरे , पोपटराव सावंत , सुधीर पाटील , दिलीप महाले, शरद बरहाटे, घुले आदींनी केले आहे.

COMMENTS