बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नाव वापरता येणार नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नाव वापरता येणार नाही

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव मंजूर

मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय अन्

संगणक कर्मचार्‍यांना कनिष्ठ लिपिक पदाची लॉटरी
राष्ट्रवादीचे 12 आमदार फुटीच्या मार्गावर?
आमदार अपात्रतेचा लवकर फैसला करावा

मुंबई : बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय अन्य काही ठराव मंजूर करण्यात आले आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाला उघड आव्हान दिले असून पक्षातील आमदारांना आपल्या बाजूने वळवले आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभर राज्यात राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेना भवनात पुढील रणनीती ठरवण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक झाली.
या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले, असे म्हणत ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना ठाकरे यांनी त्यांना परत घेणारच नाही असे स्पष्ट केले. शिवसेना निखारा आहे. त्यावर पाय ठेवला तर जाळून टाकू, असा इशाराही ठाकरेंनी दिला. बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान या कार्यकारिणीत महत्वाचे पाच ठराव देखील मांडण्यात आले. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्‍वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे ठाकरे यांना आहेत.शिवसेनेशी गद्दारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील असे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.

COMMENTS