‘एमआयएम’ची रॅली नगर पोलिसांनी अडवलीच नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एमआयएम’ची रॅली नगर पोलिसांनी अडवलीच नाही

अहमदनगर/प्रतिनिधी : मुंबईतील मोर्चासाठी जाणारी एमआयएमची रॅली नगर-औरंगाबाद रोडवरील प्रवरा संगम येथे पोलिसांनी अडवली होती. पण त्याच्या निषेधार्थ कार्यक

पाथर्डीत ओबीसी आंदोलकांचा रास्ता रोको
जुने सोने विकण्यासाठी दोन वर्षांची मुदत द्या ; वर्मा यांची केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी
राहुरीत आरपीआयच्या बंदला हिसंक वळण

अहमदनगर/प्रतिनिधी : मुंबईतील मोर्चासाठी जाणारी एमआयएमची रॅली नगर-औरंगाबाद रोडवरील प्रवरा संगम येथे पोलिसांनी अडवली होती. पण त्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी तेथेच रस्ता रोको व ठिय्या आंदोलन सुरू केल्याने व त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ लागल्याने अखेर पोलिसांनी रॅली जाऊ दिले व नगरमधून जातानाही तिला थांबवले नाही. उलट, बाह्यवळण रस्त्याने रॅलीचा मुंबई मार्ग मोकळा केला. दरम्यान, ही रॅली नगर शहरात येऊ नये म्हणून शहरातील विविध रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
मुस्लीम आरक्षण तसेच वक्फ बोर्डाशी संबंधित जमीन आणि इतर काही मागण्यांसाठी औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी औरंगाबादहून रॅली काढण्यात आली. यावेळी नगर जिल्हयात ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ही रॅली शेंडी-विळद घाट-नेप्ती बाजार समिती व पुणे बायपास या बाहयवळण रस्त्याने शहराबाहेरून वळवून पुण्याकडे रवाना केली.

ठिय्या आंदोलन केले
मुंबई येथे एमआयएमचे अध्यक्ष खा.ओवेसी यांची सभा होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. या सभेला व राज्यभरांतून येणार्‍या रॅलींना राज्य सरकारने आणि पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, तरीही रॅली व सभा होणार असल्याचे एमआयएमकडून सांगण्यात आले आहे. त्यातच खा. जलील हे अनेक वाहनांच्या ताफ्यासह मुंबईतील सभेसाठी औरंगाबादहून रवाना झाल्याचे समजल्यावर नगर जिल्ह्याच्या हद्दीत पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेऊन कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रॅलीमुळे वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली. या रॅलीला परवानगी नसल्याचे सांगत नगर जिल्ह्याच्या सीमेवर नेवासे तालुक्यातील प्रवरा संगम येथे नगर पोलिसांकडून रॅलीला अडवण्यात आले होेते. पोलिसांनी अडवल्यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन केले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पोलिसांनी दिले होते. पण, कुणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. रॅलीसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती. राज्य सरकारकडून आमची रॅली रोखण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप खा. जलील यांनी केला. अखेर पोलिसांनी पुढे रॅली नेण्यास परवानगी दिली.

नगरमध्ये बंदोबस्त
त्यानंतर पोलिसांनी प्रवरा संगमहून निघालेल्या रॅलीला नगर शहरात येऊ न देता शेंडी गावातून बाह्यवळण रस्त्याने नगर शहराच्या बाहेरून जाऊ दिले. या रॅलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून शेंडी, कल्याण रस्ता, केडगाव, डीएसपी चौक, कोठला आदी ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे कर्मचारी ठिकठिकाणी तैनात होते.

COMMENTS