मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले

अहमदनगर/प्रतिनिधी : मोटारसायकलवर ट्रीपल सीट जाणार्‍यांपैकी मध्यभागी बसलेल्याने रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूम स्टाईलने

कोकमठाणमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण, कीर्तन महोत्सव
नवीन तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव तयार करा
सिव्हिल जळीतकांड : डॉ. पोखरणा यांना कोण पाठीशी घालतंय ? | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : मोटारसायकलवर ट्रीपल सीट जाणार्‍यांपैकी मध्यभागी बसलेल्याने रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूम स्टाईलने पळवले. सावेडीच्या भिस्तबाग परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॉर्निंग वॉककरीता पहाटे घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पाऊण तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवरील चोरट्यांनी धूम स्टाईलने लंपास केले. ही घटना सावेडीतील भिस्तबाग चौकाकडून पद्मावती टी पॉइंटकडे जाणार्‍या रस्त्यावर शुक्रवारी घडली. याबाबतची माहिती अशी की सुनीता बांगर व त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या कुलकर्णी काकू या दोघी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. भिस्तबाग चौकाकडून पद्मावती टी पॉइंटकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांपैकी मध्यभागी बसलेल्या चोरट्याने सुनीता यांच्या गळ्यातील मिनी गंठण ओरबाडले असता सुनीता यांनी अर्धे गंठण हातात धरून ठेवल्याने पाऊण तोळे गंठण चोरट्याने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसात सुनीता हरिदास बांगर (वय 36, रा. लोकमान्यनगर, भिस्तबाग नाक्याजवळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

COMMENTS