Homeताज्या बातम्यासंपादकीय

पवन खेरा अटकेचा अन्वयार्थ ! 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' पदयात्रेच्या प्रारंभपूर्वीच काँग्रेसमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले होते; त्यातला एक सर्वात म

युत्या खुशाल कराव्या, पण, विचारांचे भान राखून !
शुध्दीकरणाची सांस्कृतिक मुर्खता !
सर्वच आता निवडणूकमय ! 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेच्या प्रारंभपूर्वीच काँग्रेसमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले होते; त्यातला एक सर्वात मोठा बदल होता की, प्रवक्ते पदावर ज्या नियुक्त केल्या गेल्या त्यात जयराम रमेश, पवन खेरा आणि श्रीमती शिनाते या तीन प्रवक्त्यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये एक प्रकारचा जीव आल्याचे लक्षात आले होते. यापूर्वी सुरजेवाला यांच्या प्रवक्ते पदाच्या काळात काँग्रेसचे आक्रमण एक विरोधी पक्ष म्हणून मैदानात कधीही दिसले नाही. परंतु, पवन खेरा यांनी काँग्रेसच्या ज्या ज्या प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषदा घेतल्या, त्यामध्ये अतिशय आक्रमक भूमिका त्यांनी बजावली आहे! सत्ताधारी पक्षाचे नेमके काय संबंध कुठे आहेत, याचा भंडाफोड करत त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा यापूर्वी पार पडल्या आहेत. त्यामुळे पवन खेरा हे कधी ना कधी केंद्र शासनाच्या हिटलिस्ट वर येतीलच, अशी संभावना वाटत असतानाच, अतिशय हाय प्रोफाईल ड्रामा करीत त्यांना अटक  करण्यात आली. मात्र, त्यांच्या अटकेसाठी शेकडो नागरिकांना त्रास देऊन ही अटक केली गेली. अर्थात यात अटकेला काँग्रेसने ‘हिटलरशाही’ असे संबोधन करित केंद्र सरकारवर टीका केली; तर, सत्ताधारी भाजपाने, ‘कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही,’ अशी प्रतिक्रिया यावर व्यक्त केली. लोकशाही देशात अतिशय नाट्यमय आणि मोठी घडामोड मानली गेली पाहिजे. कारण पवन खेरा हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आहेत, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी केव्हाही त्यांची उपलब्धी ही निश्चितपणे दिसते. त्यामुळे, जर त्यांच्या विरोधात एखादी केस आसाम राज्यात झाली होती, तर, त्यांना येथावकाश अटक करण्याची भूमिका घेता आली असती. परंतु, संपूर्ण विमानातील प्रवासीच बाहेर काढून, विमानाचे उड्डाण रद्द करून, प्रवाशांना पर्यायी विमान उपलब्ध करून देऊन, प्रवाशांचे केलेले हाल ही अतिशय दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रायपूर येथे होत असताना, त्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी जात असतानाच पवन खेरा यांना अटक करण्यात आली. एवढेच नव्हे तर रायपूर अधिवेशनाच्या आधीच छत्तीसगडमधील ज्या लोकांनी रायपूर अधिवेशनासाठी आर्थिक मदत दिली, त्यांच्या विरोधातही अनेक कारवाया केंद्र सरकारने या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी केल्या. काँग्रेसच्या या अधिवेशनापूर्वीच केंद्र सरकारने बजावलेली ही भूमिका निश्चितपणे लोकशाहीला शोभणारी नाही, असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. अर्थात या अटकेला काँग्रेसने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले त्यामुळे पवन खेरा यांची दुपारी जामीन देऊन सुटका करण्यात आली. त्यामुळे त्यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला. अर्थात पवन खेरा यांचीच अटक करण्यामागे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अपमान जनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात, हे वक्तव्य नेमके जाहीर करण्यास योग्य नसल्याचे सांगत, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर मात्र ते वक्तव्य एका चित्रध्वनिफितीद्वारे ऐकण्यात आले आहे. अर्थात काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वी पवन खेरा यांच्या अटकेच्या संदर्भात झालेले हे नाट्य, एकंदरीत २०२४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी आगामी काय काय संकटे असतील, याची झलक दाखवणारेच आहे. कारण २०२४ ची लोकसभा निवडणूक ही देशात यापूर्वी कधी नव्हे एवढी महत्त्वपूर्ण झाली आहे. कारण या निवडणुकीत वर्तमान सत्ताधारी पुन्हा निवडून आले तर संविधान बदलण्याचे आरोप केले जातात; तर विरोधी पक्ष हा राष्ट्रीय आघाडी करण्याच्या तयारीत दिसतो, अशा वेळी पवन खेरा यांची अटक या संदर्भात पाहावी लागेल.

COMMENTS