नाशिक: मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांच्या संकल्पनेतून 'मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल' या पहिल्या मराठी वैश्विक श
नाशिक: मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मानवधन ग्लोबल लँग्वेज स्कूल’ या पहिल्या मराठी वैश्विक शाळेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून मराठी भाषा शिकवण्याकरिता एक पाऊल पुढे टाकून कार्य सुरू केले आहे. ‘मराठी माझी मातृभाषा’ याचा सार्थ अभिमान मराठी माणसाला असावा त्याच विचाराने मराठी भाषेची जोपासना केली पाहिजे. मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी ‘हाती घ्याल ते तडीस न्या!’ या भूमिकेतून आलेल्या अनेकविध अडचणींचा सामना करत ११ जानेवारी २०२१ साली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ.ई. वायुनंदन, शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या शुभहस्ते ११ जानेवारी २०२१ साली सुरू केलेली ही स्कूल यशस्वीपणे कार्यरत असून या शाळेच्या माध्यमातून अमेरिका, इंग्लंड,जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या अनेक देशात वास्तव्यास असलेल्या अनेक मराठी कुटुंबातील पुढच्या पिढीला मराठी भाषा शिकवण्याचे कार्य सुरू आहे. संस्थेने स्वतः तयार केलेल्या या शाळेच्या अभ्यासक्रमाची रचना चार भागात केलेली आहे. या पुस्तकांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठीच्या अभ्यासक्रमातील संदर्भ साधनांमध्ये (एम.ए.मराठी प्रथम वर्ष – द्वितीय सत्र – संदर्भ साधने क्र.१२) समावेश करण्यात आला आहे. सिद्धीस नेलेल्या कार्याची उंची गाठणारे हे शिखर आहे. यायोगे सहजच मराठी भाषा अभिजात भाषेची उंची गाठणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी अमृताला पैजा जिंकायला लावणार्या मराठीचे कोडकौतुक पुरवले तर मानवधन संस्थेच्या माध्यमातून ‘माय मराठीला’ जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका घेतली गेली आहे.
आज विविध देशातील अनेक मुले उत्तम प्रकारे मराठी बोलू व वाचू लागली आहेत. आपल्या भारतातील आजी आजोबांशी मराठीतून संवाद साधत आहेत. या शाळेच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे संसथेचे कार्य सुरू आहे. ‘इतिहास घडण्यासाठी कार्य करू नका. तर जे कार्य कराल त्याचा इतिहास घडेल असे ध्येयासक्त बना !’ हाच संदेश आणि शिकवण देत कार्य करीत असल्याचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी यावेळी नमूद केले.
COMMENTS