Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला सुरुवात

लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सातारा प्रतिनिधी - उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला पौष पोर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मध्यरात्री पासून सुरु

निवडणूक आयोगाने नागरिकांच्या जिविताशी खेळू नये!
 सारा अली खान वर आली चेहरा लपवण्याची वेळ
बीएसएनएलचे अच्छे दिन सुरू ; 30 लाख जोडले नवे ग्राहक

सातारा प्रतिनिधी – उभ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवीच्या मुख्य यात्रेला पौष पोर्णिमेच्या दिवशी गुरुवारी मध्यरात्री पासून सुरुवात झाली असून मांढरदेवीची पालखी छबिना गावातून वाजत-गाजत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मांढरदेव गडावर आणण्यात आली आणि मुख्य यात्रेला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी पहाटे मांढरदेवी मंदिरात मांढरदेव देवस्थान ट्रस्टचे सर्व प्रमुख तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शाकंभरी पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर काळुबाई देवीची महापूजा करण्यात आली.  त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडले जात असून महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यातील देखील लाखो भाविक मांढरदेव गडावर देवीच्या दर्शनासाठी आले आहेत. 2005 साली झालेल्या दुर्घटने नंतर मांढरदेव गडावर अनेक निर्बंध लावण्यात आल्याने गडावर  पशुहत्या , नारळ फोडण्यास आणि कर्मकांड करण्यास मनाई करण्यात आली आहे. या गोष्टीवर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मांढरदेव यात्रा राज्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने या यात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रसनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. मांढरदेवीची यात्रा आज संपन्न होत असल्याने काल रात्रीपासूनच  देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिरास फुलांची आरास करण्यात आली होती. तर  देवीचा गाभारा देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. यात्रेसाठी मांढरदेव गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची संपूर्ण दक्षता सातारा जिल्हा प्रशासन आणि यात्रा कमिटीने घेतली असून मांढरे देव गडावर यात्रेनिमित्त येणाऱ्या लाखो भविकांच्यात मोठा उत्साह पहायला मिळत आहे.

COMMENTS