धाराशिव ः तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर महाद्वार पूर्व बाजूला असावे, या मुख्य मागणीसाठी कुंभार समाज बांधवांच्या वतीने (2 एप्रिल) धाराशिवमध्

धाराशिव ः तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर महाद्वार पूर्व बाजूला असावे, या मुख्य मागणीसाठी कुंभार समाज बांधवांच्या वतीने (2 एप्रिल) धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
तेर (ता.जि.धाराशिव) येथील संत गोरोबा काका मंदिराच्या प्रस्तावित महाद्वाराचे (कमान) काम सुरू आहे. अनेक वर्षापासून गोरोबाकाका मंदिराचे महाद्वार पूर्व बाजूला आहे, मात्र नव्याने महाद्वाराची जागा बदलून पश्चिमेला महाद्वार उभारणीचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना गोरोबाकाका भावीक भक्तांनी काम रोखून धरले होते. 21 फेब्रुवारी 2025 रोजी प्रशासक धर्मादाय आयुक्त धाराशिव यांना आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना गोरोबाकाका भक्तांनी प्रत्यक्ष भेटून वस्तुस्थिती आणि वास्तुशास्त्राप्रमाणे महाद्वार पूर्वेकडे उभारण्यात यावे असे सांगितले होते. मात्र स्थानिक भाजप नेते, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दबाव निर्माण करून, कुंभार समाजाचे स्थानिक नेते महादेव भागवत खटावकर यांना दाब दडपशाही करत मंदिराचे खोदकाम चालू केले आहे. प्रशासन राजकीय दबावापोटी ग्रामस्थ, भाविक भक्तांच्या आणि वास्तुशास्त्राच्या मागणीचा विचार न करता हूकुमशाही पद्धतीने काम सुरू करत आहे. हे काम तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी बुधवार (2 एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुंभार समाज बांधवांसह भाविक भक्तांनी आमरण-उपापेषण पासून सुरू केलेले आहे.
या संदर्भात निवासी जिल्हाधिकार्यांना डॉ. अशोक सोनवणे यांनी सविस्तर माहिती देऊन, महाद्वाराचे काम पूर्व दिशेलाच व्हावे अशी शिष्टमंडळाच्या समवेत मागणी केली. या निवेदन देऊन तात्काळ दखल घेण्याची विनंती केली आहे. निवेदनावर महाराष्ट्र कुंभार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोकराव सोनवणे, प्रदेश सरचिटणीस विनायक राऊत, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष महादेव खटावकर, नितीन घोडके, नागनाथ कुंभार, रंगनाथ सूर्यवंशी, दत्ता कुंभार, योगेश क्षीरसागर, श्रीपत कुंभार, ज्ञानेश्वर भागवत माऊली कुंभार, वसंत सोमवंशी यांच्या स्वाक्षर्या आहेत.
COMMENTS