मुख्यमुंत्री फडणवीस-शिंदेंत थेट संवादमुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम वि

मुख्यमुंत्री फडणवीस-शिंदेंत थेट संवाद
मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचा पेच लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला असून, या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी थेट फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतून परतल्यानंतर महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत.
गत आठवड्यात पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाने 29, ठाकरे गटाने 65, काँग्रेसने 24 तर मनसेने 6 जागा जिंकल्या आहेत. संख्याबळ पाहता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी महापौरपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत चर्चा आणि दबावाचे राजकारण सुरू आहे. भाजपच्या पाठिंब्याशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याची जाणीव होताच शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले. यानंतर अडीच वर्षे महापौरपदाची मागणी करत भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात उत्सुकता वाढली असून महापौरपदाचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दावोसहून फोनवर संवाद झाला. या चर्चेत दावोस दौर्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्यावर एकमत झाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

COMMENTS