Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळ असलेली गाठ काढतांना वाचविले फुफ्फूस

डॉ.स्‍वप्‍निल साखला यांची कामगिरी, टीमचे मिळाले सहकार्य

नाशिक- पन्नास वर्षीय रुग्‍णाला फुफ्फूसात गाठ असल्‍याचे आढळून आले होते. अनेक डॉक्‍टरांचा सल्‍ला घेतल्‍यावर फुफ्फूस काढावे लागण्याची शक्‍यता वर्तवि

संगमनेरला तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा
तगरखेडा येथील शेतकर्‍याची आत्महत्या
कत्तलीसाठी जाणार्‍या 38 गाईंची सुटका

नाशिक– पन्नास वर्षीय रुग्‍णाला फुफ्फूसात गाठ असल्‍याचे आढळून आले होते. अनेक डॉक्‍टरांचा सल्‍ला घेतल्‍यावर फुफ्फूस काढावे लागण्याची शक्‍यता वर्तविली होती. परंतु मुंबईनाका येथील नारायणी हॉस्‍पिटल येथे प्रसिद्ध फुफ्फूसविकार तज्‍ज्ञ डॉ.स्वप्‍निल साखला यांनी रुग्‍णाचे फुफ्फूस वाचवितांना शस्‍त्रक्रियेतून समुळ गाठ यशस्‍वीरित्‍या काढली आहे. यासाठी त्‍यांना डॉ.अभिनंदन मुथा व टीमचे सहकार्यदेखील मिळाले. अशा प्रकारची क्‍लिष्ट व गुंतागुंतीची शस्‍त्रक्रिया करून आरोग्य क्रांती केली आहे. यामुळे डॉ.स्‍वप्‍निल साखला व डॉ.अभिनंदन मुथा यांचे स्तरातून अभिनंदन होत आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देतांना डॉ.स्‍वप्‍निल साखला म्‍हणाले, धुळे जिल्‍ह्‍यातील शिरुड येथील या ५० वर्षीय रुग्‍णाची एन्‍डोस्‍कोपी केली असता, फुफ्फूसामध्ये गाठ असल्‍याचे दिसून आले. भयभित झालेल्‍या रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी अनेक ठिकाणी वैद्यकीय सल्‍ला घेतला. बहुतांश ठिकाणी त्‍यांना फुफ्फूस काढावे लागणार असल्‍याचे सांगितले. नाशिक येथील एका खासगी रुग्‍णालयात सल्‍ला घेतला असता, तेथे डॉ.स्‍वप्‍निल साखला यांचा सल्‍ला घेण्यास सांगण्यात आले. त्‍यानुसार रुग्‍णांनी नारायणी हॉस्‍पिटलला सर्व आवश्‍यक तपासण्या केल्‍या. वैद्यकीय तपासण्या केल्‍या असता, कॉन्‍सीनॉईड ट्युमर या सौम्‍य प्रकारच्‍या कर्करोगाची गाठ असल्‍याचे निदान झाले. रुग्‍णालयात दाखल करुन घेतांना रुग्‍णावर ‘रिजिड ब्रॉन्‍कोस्‍कोपिक ट्युमर डी बल्‍कींग’ ही शस्‍त्रक्रिया करण्यात आली. या प्रकियेत रुग्‍णाचे फुफ्फूस  न काढता, गाठ मात्र समुळ काढण्यात यश आले. या उपचार प्रक्रियेसाठी डॉ.अभिनंदन मुथा, डॉ.भरत द्विवेदी, डॉ.हितेश, डॉ.नीलेश पितृभक्‍त व नारायणी हॉस्‍पिटलच्‍या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले.

शस्‍त्रक्रियेत अशी असते जोखीम – अशा प्रकारची शस्‍त्रक्रिया करण्यासाठी विशेष कौशल्‍यांची आवश्‍यकता असते. तसेच शस्‍त्रक्रियेदरम्‍यान थोडा जरी रक्‍तस्‍त्राव झाला तरी रुग्‍णाच्‍या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्‍हणून ही शस्‍त्रक्रिया अत्‍यंत जोखीमीची समजली जाते. परंतु अशा शस्‍त्रक्रिया करण्याचे कौशल्‍य व अनुभव डॉ.स्‍वप्‍निल साखला यांच्‍याकडे आहे. विशेष म्‍हणजे अशा प्रकारची शस्‍त्रक्रिया करणारे ते नाशिकमधील एकमेव सर्जन आहेत.

COMMENTS