Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच

राहुल कनाल करणार जय महाराष्ट्र

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटातील एक-एक शिलेदार पक्षाला सोडून शिवसेनेत प्रवेश करतांना दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती कशी रोखणार हा

लोकानुनयाचा उदय
बसअभावी विद्यार्थ्यांना बघावी लागते तासनतास वाट
पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका

मुंबई/प्रतिनिधी ः ठाकरे गटातील एक-एक शिलेदार पक्षाला सोडून शिवसेनेत प्रवेश करतांना दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती कशी रोखणार हा पक्षासमोर महत्वाचा प्रश्‍न आहे. मुंबई महापालिकेवर आज शनिवारी ठाकरे गट विराट मोर्चा काढण्याच्या तयारीत असतांनाच, ठाकरे गटाला गळती लागतांना दिसून येत आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांचे विश्‍वासू राहुल कनाल यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ते आज 1 जुलै रोजी शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत.
राहुल कनाल हे युवा सेनेत महत्त्वाच्या पदावर होते. आदित्य ठाकरे यांचे ते विश्‍वासू समजले जात होते. मात्र, ते शिंदे सेनेच्या वाटेवर होते. महिनाभरापूर्वी कनाल यांनी युवा सेनेच्या कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला होता. त्यामुळे त्याच्या भावी वाटचालीबद्दल शंका उपस्थित केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर कनाल यांच्या अखत्यारीत येणार्‍या वांद्रे पश्‍चिम विभागातील युवा सेनेची सर्व पदे स्थगित करण्यात आली आहेत. त्यानंतर ट्विट करतांना कनाल यांनी म्हटले आहे की, ’खूप वाईट वाटत आहे. हे सगळे कुणी केले मला चांगले माहीत आहे. पण तुमच्यासाठी काम करणार्‍या लोकांची बाजू ऐकून न घेता त्यांना पदावरून काढणे हा उद्धटपणा आहे. तुम्ही मला काढू शकता, पण तुमच्यासाठी दिवसरात्र काम करणार्‍यांचे काय?, असा सवाल कनाल यांनी केला आहे. अहंकार आणि उद्धटपणा काय असतो हे लोकांना कळले हे बरे झाले, असेही त्यांनी म्हटले आहे. ’जय महाराष्ट्र माझ्याखातर दिवसरात्र काम करणार्‍या कार्यकर्त्यांचे मला वाईट वाटते. योग्य गोष्टींसाठी उभे राहिल्यानंतर हे सहन करावेच लागते. तुम्ही ते केले, त्याबद्दल तुमचे आभार, असेही कनाल यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले. मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. ठाकरेंनी बीएमसीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चाची घोषणा करताच कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकाशात आला आहे. ईडीने ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर छापे टाकणे सुरू केले आहे. तर, दुसरीकडे  एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रमुख लोक गळाला लावण्याचे काम सुरू केले आहे. नुकत्याच विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता राहुल कनालही प्रवेश करणार आहे.

COMMENTS