Homeताज्या बातम्याविदेश

घरमालकाने भाडेकरूने पैसे दिले नाही म्हणून त्याच्या राहत्या घराला आग लावली

न्यूयॉर्क प्रतिनिधी - अमेरिका देशातील न्यूयॉर्क येथील शहरात एक धक्कादायक घटना घडली असून एकाच कुटुंबातील आठ जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्

पन्नास टक्के अनुदानावर मिळणार नारळ व आंब्याची रोपे ः सोमनाथ डफाळ
नव्या लोकसभेच्या दिशेने….!
आलिया भट्टने खरेदी केली आलिशान कार

न्यूयॉर्क प्रतिनिधी – अमेरिका देशातील न्यूयॉर्क येथील शहरात एक धक्कादायक घटना घडली असून एकाच कुटुंबातील आठ जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी घर मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाड्याने राहणाऱ्या कुटुंबांने घर भाडे थकवल्यामुळे मालकात आणि भाडेकरूमध्ये वाद झाले होते. त्या वादामधूनच भाडेकरू राहत असलेली इमारत मालकाने पेटवून दिली. एका कुटुंबाला जिवंत जाळण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या इमारतीला आग लावून टाकल्याने पोलिसांनी रफिकुल इस्लाम या 66 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. भाड्याने राहत असलेल्या त्या कुटुंबामध्ये सहा लहान मुले होती. मागील बऱ्याच महिन्यांपासून भाड्याने राहत असलेल्या कुटुंबाने भाडं थकवलं होतं. आणि घर सुद्धा रिकामे करत नव्हते. त्यामुळे भाडेकरू व मालक यांच्यामध्ये वाद झाला.

तिथल्या अग्निशामन दलान फेसबुक वर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भाडेकरू कुटुंब हे रफिकुल इस्लामच्या मालकीच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहत होते. मागील काही महिन्यांपासून त्यांनी भाडं दिलं नव्हतं आणि घर देखील काम करत नव्हते. या कारणामुळे रफिकुल संतापला आणि त्याने इमारतीच्या जिन्यास आग लावली. त्यावेळी घरात एकूण आठ जण माणसे होते त्यापैकी सहा लहान मुले होती. या अगोदर सुद्धा इस्लामन भाडेकरू कुटुंबाला भाडे न दिल्यास वीज पुरवठा, गॅस पुरवठा खंडित करून घर पेटवून देईन अशी धमकी दिली होती. असे भाडेकरू कुटुंबाने सांगितले. चार आठवड्यापासून पोलिसांनी या घटनेचा तपास केला आहे. या तपासामध्ये त्यांना सीसीटीव्ही मध्ये इस्लाम मास्क आणि हुडी घालून येताना दिसला होता. चेहरा दिसू नये यासाठी त्यांनी मास्क लावला होता.

COMMENTS