सावकाराने लिहून घेतलेली जमीन पोलिसांमुळे मिळाली परत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावकाराने लिहून घेतलेली जमीन पोलिसांमुळे मिळाली परत

अहमदनगर/प्रतिनिधी : सावकाराने लिहून घेतलेली जमीन पोलिस निरीक्षकांमुळे संबंधित शेतकर्‍याला परत मिळाली. कर्जत तालुक्यात ही घटना घडली. याबाबतची माहिती अ

मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्युचा सापळा ! l LokNews24
नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत
श्रीराम कथा व अखंड हरीनाम सप्ताह रायतळेत उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी : सावकाराने लिहून घेतलेली जमीन पोलिस निरीक्षकांमुळे संबंधित शेतकर्‍याला परत मिळाली. कर्जत तालुक्यात ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील भोसे येथील शेतकरी नितीन नामदेव क्षीरसागर यांनी त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे भोसे येथीलच एका सावकाराकडून सन 2016 साली 3 लाख रुपये 3 टक्के व्याजदराने घेतले होते. त्याबदल्यात त्या सावकाराने त्यांच्याकडून 1 एकर जमीन पैसे परत देण्याच्या बोलीवर लिहून घेतली होती. त्यानंतर क्षीरसागर यांनी मध्यंतरीच्या काळात 2 लाख 20 हजार रुपये सावकाराला दिले. मात्र, सावकार आणखी 6 लाख 50 हजार रुपयांची मागणी करत होता.’मी तुम्हाला भरपूर पैसे दिलेत, तरी आणखी 4 लाख रुपये देतो व माझी जमीन मला परत करा’ अशी क्षीरसागर यांनी सावकाराला विनंती केली. मात्र 3 लाखाचे 6 लाख 20 हजार देत असून देखील सावकार जमीन परत करण्यास नकारच देत होता. क्षीरसागर हतबल झाल्यानंतर त्यांनी थेट कर्जत पोलिस ठाणे गाठत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना भेटून सर्व हकीकत सांगितली. यादव यांनी पोलिस अंमलदार सुनील माळशिखरे, मनोज लातूरकर, अमित बर्डे, भाऊसाहेब यमगर यांना संबंधित सावकाराला तात्काळ बोलावून घेण्याचे आदेश दिले. यादव यांच्या धसक्याने सावकाराची बदललेली नियत भानावर आली आणि ‘लगेच जमीन परत करतो’असे त्याने सांगितले व दि.17 नोव्हेंबर रोजी सावकाराने संबंधित जमीन शेतकर्‍याला परत केली आहे. व्याजाच्या पैशांच्या बदल्यात कर्जत तालुक्यातील अनेक गोरगरीब शेतकर्‍यांच्या जमिनी स्वतःच्या नावे लिहून घेत अनेक खासगी सावकार गब्बर झाले. यात अनेकांचे संसार धुळीस मिळाले. मुलांच्या शिक्षणाबरोबरच कुटुंबाचीही वाताहत झाली. या सगळ्या चक्रव्युहात कर्जतच्या पोलिस निरीक्षक पदाचा पदभार चंद्रशेखर यादव यांनी स्वीकारला आणि कर्जतच्या सावकारांना व त्यांच्या सावकारकीला लगाम बसला. सावकारांनी व्याजात हडपलेल्या जमिनी शेतकर्‍यांना परत मिळू लागल्या. यामुळे पोलिस निरीक्षक यादव आणि कर्जत पोलिसांवरील तालुक्यातील जनतेचा विश्‍वास वाढत चालला आहे.

COMMENTS