Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढीत मानाची होळी पेटवत कानिफनाथ यात्रेला सुरूवात

पाथर्डी ः तालुक्यातील मढी येथे होळी, रंगपंचमी व फुलोरबाग अशा तीन टप्य्यात पार पडणार्‍या व कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या मढी यात्रेला रविवार

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २१ जून २०२१ l पहा LokNews24
कर्मवीर काळे विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.6 टक्के
शेतकर्‍यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना  

पाथर्डी ः तालुक्यातील मढी येथे होळी, रंगपंचमी व फुलोरबाग अशा तीन टप्य्यात पार पडणार्‍या व कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या मढी यात्रेला रविवारी मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली.
रविवारी सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी मुख्य मानकरी नारायणबाबा जाधव यांच्या हस्ते नाथांच्या मंदिराच्या कळसाला टेकवून तर सायंकाळी उशिरा गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवून यात्रेला सुरवात करण्यात आली.कानिफनाथांच्या मंदिराच्या बांधकामाला भटक्या समाजातील बांधवानी मोठी मदत केल्याने या यात्रेत भटक्या समाजाला अनेक मान दिले असून मढी ला भटक्यांची पंढरी म्हणूनही संबोधले जाते.कैकाडी व गोपाळ समाजाने मंदिर बांधकामासाठी मोठे योगदान दिल्यानेच कैकाडी समाजाची मानाची काठी  अस्तन्या  मंदिराच्या कळसाला आज सकाळी लावण्यात येऊन यात्रेला सुरवात करण्यात आली. कैकाडी समाजाचे मानकरी नारायणबाबा जाधव यांचा या वेळी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सत्कार केला तर या वेळी बबन मरकड,डॉ.विलास मरकड,रवींद्र आरोळे,शामराव मरकड,नवनाथ मरकड,डॉ.रमाकांत मरकड यांच्यासह कैकाडी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिराच्या कळसाला जी काठी टेकवली जाते त्या मानाच्या काठीची काल पूर्ण रात्र मिरवणूक काढण्यात आली तर रविवारी सकाळी मढी गावाला प्रदिक्षणा घातल्या नंतर नाथांचा जयघोष करत व डफ वाजवत काठी टेकवण्याचा सोहळा पार पडला तर सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी गोपाळ समाजाची होळी पेटवण्यात येत असते मात्र चालू वर्षी होळी पेटवणार्‍या मानकर्‍यांनी सूर्यस्ताच्या आधीच होळी पेटवणार असे लेखी पत्र पोलीस प्रशासनाला दिल्याने सूर्यास्ताच्या आधीच गोपाळ समाजाने अगोदर मिरवणूक काढली.ही मिरवणूक मुख्य गडावर गेल्यानंतर देवस्थान समितीने मानाच्या पाच गोवर्‍या गोपाळ समाजाचे होळी पेटवणारे मानकरी माणिकराव धनाजी लोणारे,नामदेवराव शामराव माळी,रघुनाथ मुरलीधर काळापहाड,हरिभाऊ किसन गव्हाणे,भागीनाथ पुंडलिक नवघरे,ज्ञानदेव लक्ष्मण गव्हाणे यांना मानाच्या गोवर्‍या दिल्यानंतर या गोवर्‍या वाजत गाजत मंदिराच्या पायथ्याला आणण्यात येऊन ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या ठिकाणी आणून नाथांचा जयघोष करत होळी पेटवण्यात आली.या वेळी गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर होळी कोणी पेटवायची या विषयी पूर्वी वाद झाला असल्याने या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.होळी पेटवते वेळी प्रांताधिकारी प्रसाद मते,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, भाऊसाहेब मरकड, झेंडू पवार हे उपस्थित होते.

COMMENTS