Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा तापणार

मुंबई/प्रतिनिधी : ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्

तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहीर करा
मुंबई-गोवा महामार्गावरून महायुतीतील नेत्यांत खडाजंगी
आरती सिंग यांचा रवी राणांवर पलटवार

मुंबई/प्रतिनिधी : ठाकरे सरकारच्या काळात राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण चांगलंच तापले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. मनसेकडून राज्यात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे गुढीपाडव्याला पक्षाच्या मेळाव्याला काय बोलणार, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS