माजलगाव । प्रतिनिधीतुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, माजलगाव शाखेचे सोनेतारण कर्ज खातेदार आडे एकनाथ मानसिंग यांचे हार्ट अटॅकने द

माजलगाव । प्रतिनिधी
तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, माजलगाव शाखेचे सोनेतारण कर्ज खातेदार आडे एकनाथ मानसिंग यांचे हार्ट अटॅकने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात संस्थेच्या वतीने मानवीय दृष्टिकोनातून तातडीने कार्यवाही करत गोल्ड लोन कर्जावर असलेला 1 लाख 35 हजार रुपयांचा इन्शुरन्स मंजूर करण्यात आला. मंजूर झालेली इन्शुरन्स रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा करून सोनेतारण कर्ज खाते पूर्णतः बंद करण्यात आले. त्यानंतर गहाण ठेवलेले सोने व दागिने अधिकृतरीत्या त्यांचे वारसदार आडे निलाबाई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या प्रसंगी तुळजाभवानी अर्बनचे बीड विभागाचे रिजनल ऑफिसर अमोल बिडवे, गोल्ड लोन अधिकारी लक्ष्मण पवार, प्रकाश शेजुळ तसेच डाके मॅडम उपस्थित होते. संस्थेच्या या तत्पर व सहकार्यपूर्ण भूमिकेमुळे वारसदार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS