Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील विविध स्पर्धा परीक्षासाठी आकारण्यात आलेले वाढीव शुल्क कमी करण्यात यावे

बी.एस.एफ.ग्रुप.ची मुख्यमंत्र्याकडे मागणी

बीड प्रतिनिधी - राज्यात घेतल्या जाणार्‍या विविध स्पर्धा परीक्षा त्यामध्ये तलाठी, वनरक्षक भरती, नगरपरिषद,जिल्हा परिषद ,पनवेल महानगर पालिका इत्यादी

जयंत पाटलांना दुसर्‍यांदा ईडीचे समन्स
मॉलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद
अमरावतीमध्ये धडकला जन एल्गार मोर्चा

बीड प्रतिनिधी – राज्यात घेतल्या जाणार्‍या विविध स्पर्धा परीक्षा त्यामध्ये तलाठी, वनरक्षक भरती, नगरपरिषद,जिल्हा परिषद ,पनवेल महानगर पालिका इत्यादी परीक्षासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षेसाठी रुपये 1000, 900,800,700 एवढी परीक्षा फी आकारली जाते. काही विद्यार्थी गरीब असतात,भाड्याने राहतात, स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असल्यामुळे कोणतेही उत्पन्नाचे साधन,मानधन,पगार त्यांना नसतो. त्यामुळे एकावेळी कधी कधी विविध सरळ भरतीच्या जागा निघाल्या किंवा शासकीय नोकरीच्या जागा निघाल्या तर एवढे 1000 ,900, 800, 700 ही फी बरेच विद्यार्थी अभ्यास पूर्ण झाला असतांना देखील आर्थिक परिस्थितीमुळे हा फ्रॉम भरू शकत नाही. म्हणून बी.एस.एफ्.ग्रुप.( ब्रेव सोशल फोर्स ) या सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले व महाराष्ट्र राज्य सरकारकडून वेळोवेळी घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षाकरिता अनुसूचित जाती, जमाती करिता 100 रुपये,  इतर मागसवर्गीय करिता 200 रुपये आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 300 रुपये इतके शुल्क आकरण्यात यावे तसेच यासाबंधी शासकीय स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निवेदन देण्यात आले.  यावेळी बी.एस.एफ.ग्रुप.संस्थापक अध्यक्ष भूषण सरदार, उपाध्यक्ष सेजल ताटे,  शैलेश मेश्राम, सय्याजी कदम, सौरभ गवई, आर्यमेघ सरदार सौरव शेलारे इतर अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS