Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आष्टी बसस्थानकाचे उद्घाटन सापडेना; प्रवाशांचे हाल बेहाल

कडा । प्रतिनिधीआष्टी - आष्टी येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले नवीन बसस्थानक अद्याप उद्घाटनासाठी तयार झालेले नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या

जागतिक अनुभवातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र
माझ्या दिव्यांग व शिक्षक बांधवांना तसेच गुणी विद्यार्थ्यांना अच्छे दिन यावेत यासाठी रोजा धरणार – राजेंद्र लाड
वर्धमान महावीर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कडा । प्रतिनिधी
आष्टी – आष्टी येथे लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले नवीन बसस्थानक अद्याप उद्घाटनासाठी तयार झालेले नाही, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून या इमारतीचे उद्घाटन होण्याची प्रतीक्षा सुरू असली तरी प्रशासनाकडून कुठलाही तातडीचा निर्णय घेतलेला नाही. परिणामी प्रवासी जुन्या, घाणेरड्या आणि असुरक्षित बसस्थानकावर अवलंबून आहेत.
प्रवाश्यांचे प्रश्न व अडचणी
परिसरातील असुविधा: प्रवाशांना उष्ण व थंड हवेत प्रवास करावा लागत असून पावसाळ्यात चिखलामुळे मोठी अडचण निर्माण होते. विशेषतः महिलांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरली आहे. अन्न व पाण्याची सोय नाही: उपहारगृह कार्यरत नसल्यामुळे प्रवाशांना बाहेर जाऊन नाश्ता करावा लागतो. पिण्यासाठी उपलब्ध पाणी बॅरलमध्ये अस्वच्छ ठेवले जाते. शुद्ध आणि थंड पाण्याची सोय नव्याने उभारलेल्या बसस्थानकात नाही. हिरकणी कक्ष बंद: स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे; मात्र कुलूप असल्यामुळे लहान बाळांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालावे लागते, यामुळे मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतागृहाचा अभाव: गर्भवती, वृद्ध महिला व लहान मुलांसह प्रवास करणार्‍या महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा समस्या: सुरक्षा रक्षक नसल्यामुळे महिलांसाठी छेडछाड व चोरीची भीती निर्माण झाली आहे.
संपूर्ण सुविधा तयार; पण निष्क्रिय
नवीन बसस्थानकात 10 बससाठी प्लॅटफॉर्म, एसटी चालक-वाहकांसाठी रेस्ट रूम, व्यापारी गाळे, कॅन्टीन, चौकशी कक्ष, हिरकणी कक्ष आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तरीही उद्घाटनाचा मुहूर्त न मिळाल्यामुळे या सगळ्या सुविधा धूळ खात पडून आहेत.
लग्नसराईत प्रवाशांची गर्दी व धोका
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरी, छेडछाड यासारख्या घटना घडण्याची शक्यता अधिक आहे. नागरिक हे लक्षात घेऊन प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी करत आहेत.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
आष्टी बसस्थानकासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सुविधेबाबत सुरू असलेली दिरंगाई गंभीर आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बसस्थानकाचे उद्घाटन न झाल्यामुळे थेट फटका प्रवाशांना बसत आहे. नागरिक हे विचारत आहेत, प्रवाशांचे हाल सुरू असताना लोकप्रतिनिधी गप्प का आहेत?
प्रशासनाचे दुर्लक्ष
या संदर्भात आष्टी आगार प्रमुख श्री.चोथमल यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले, तुम्ही रात्री का फोन केला? आणि लगेच फोन कापला. त्यामुळे नागरिकांचे संताप वाढत आहेत आणि स्थानक लवकर सुरू करण्यासाठी दबाव निर्माण होत आहे.
नागरिकांची मागणी
बसस्थानकाचे उद्घाटन तातडीने करावे., उपहारगृह, स्वच्छतागृह आणि हिरकणी कक्ष त्वरीत सुरू करावे., महिलांसाठी सुरक्षितता आणि सुरक्षा यंत्रणा त्वरित लागू करावी.

COMMENTS