Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व अनन्यसाधारण – कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे

नाशिक:- शेतकऱ्यांची  दिवसेंदिवस जमीन धारणा कमी होत असल्याने शेतीमध्ये यांत्रीकीकरणाला मर्यादा पडत आहेत. दुसरीकडे वेळेवर मजुरांच्या उपलब्धतेमध्ये

राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह माजी खा. राजु शेट्टी एकाच बँनरवर; राजकिय चर्चेला उधाण
स्कार्पिओ गाडी क्षणार्धात जळून खाक | LOK News 24

नाशिक:- शेतकऱ्यांची  दिवसेंदिवस जमीन धारणा कमी होत असल्याने शेतीमध्ये यांत्रीकीकरणाला मर्यादा पडत आहेत. दुसरीकडे वेळेवर मजुरांच्या उपलब्धतेमध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि वाढलेले मजुरीचे दर यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गट पद्धतीने शेतीमध्ये यंत्राचा वापर करावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांतर्गत भात कापणी यंत्रांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राचे संचालक गायकवाड, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके आणि केंद्राचे कृषी अभियांत्रिकी तज्ञ राजाराम पाटील उपस्थित होते.

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि छोट्या शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर कृषी यंत्रे व अवजारे घेण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट स्थापन करावेत व सामुहिक तत्वावर यंत्रांचा वापर करावा. कृषी यांत्रिकीकरण हि काळाची गरज बनली असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यंत्राचा वापर वाढवावा लागणार आहे. विद्यापीठ यासाठी प्रयत्नशील असून भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या मदतीने आदिवासी शेतकऱ्यांना  त्यांच्या गरजेप्रमाणे यंत्रे प्रात्यक्षिकासाठी  पुरवीत आहे. आदिवासी भागातील चढउतारावरील भात शेतीसाठी मोठ्या व ट्रॅक्टरचलित यंत्रांना मर्यादा असल्यामुळे हस्तचलीत भात कापणी यंत्रे पुरविण्यात येत आहेत. महिलांचे शेतीकामातील कष्ट कमी करण्यासाठी विद्यापीठ मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणे व छोट्या अवजारांचे प्रात्याक्षिके राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले. भात कापणी यंत्र, धान्याचे ग्रेडिंग करण्यासाठी स्पायरल सेपरेटर व भुईमुग फोडणी यंत्रांचा शेतकऱ्यांच्या गटांनी वापर करावा व परिसरातील शेतकऱ्यांना कमी पैश्यात हि सुविधा पुरवावी. आदिवासी शेतकऱ्यांसाठी तांत्रिक मार्गदर्शनासाठी विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र नेहमी तयार आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहना त्यांनी या प्रसंगी केले.

यावेळी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या शुभहस्ते भात कापणी यंत्रे, स्पायरल सेपरेटर व भुईमुग फोडणी यंत्रांचे प्रात्यक्षिकासाठी  वितरण आदिवासी शेतकऱ्यांच्या गटांना करण्यात आले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यामार्फत आदिवासी शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे या उपक्रमांतर्गत हि यंत्रे विद्यापीठाने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी यावेळी शेतकऱ्यांना केंद्राचे विविध उपक्रमांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. केंद्राचे कृषी अभियांत्रिकी तज्ञ राजाराम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

COMMENTS