Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नीचा खून करणार पती स्वतःहून पोलिसात झाला हजर..?

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे एका 35 वर्षीय पत्नीला संशयावरून पतीने एका कुठल्यातरी ठणक वस्तूने मारहाण करत खून केल्याच्या घ

हिंगोलीत युनीयन बँकेला आग
आमदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधानांना पाठवलं पोस्टकार्ड
मै भी राहुल म्हणत युवक काँग्रेसचे माहूरात जेलभरो आंदोलन !

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील येवले आखाडा येथे एका 35 वर्षीय पत्नीला संशयावरून पतीने एका कुठल्यातरी ठणक वस्तूने मारहाण करत खून केल्याच्या घटनेमुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे समजते.
घटस्थापनेच्या दिवशीच पतीने पत्नीचा खून करत तिला संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उर्मीला केशव लगे वय 35 राहणार येवले आखाडा असे मयत महिलेचे नाव असुन केशव श्रीराम लगे वय वर्ष 40 असे खून करणार्‍या पतीचे नाव आहे.राहुरी जवळील येवले आखाडा येथे मळहद्दी म्हणून ओळख असलेल्या परिसरात शेतकरी कुटुंब रहिवासी आहे. पत्नी उर्मिला व पती केशव लगे यांच्यात कायम कौटुंबिक कारणातून वाद होत असल्याचे चर्चेतून समजते. समजलेली माहिती अशी कि उर्मिला व केशव यांच्यात काल सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घरगुती कारणातून वाद झाला असुन सदर वाद हा आजूबाजूच्या लोकांनी व घरातील नातेवाईकांनी मिटवला होता. मध्यरात्री घरातील सर्व जण झोपी गेलेले असताना मयताची 15 व 17 वर्षाचे दोन मुले असून दोन्ही मुले दुसर्‍या खोलीत झोपले होते. यावेळी पुन्हा रात्री 11 ते 12 वाजे दरम्यान दोघा पती-पत्नीमध्ये पुन्हा कुठल्यातरी वादातून थिनगी उडाली. यामधे पती केशवने पत्नी उर्मिलाच्या डोक्यात कुठल्यातरी टणक वस्तूने बेदम मारहाण करत तिचा जागीच खून केल्याचे घटनास्थळी निदर्शनास आले. पती केशव याने पत्नी उर्मिलाचा खून करून पहाटे पाच वाजेपर्यंत झोपी गेला व पाच नंतर स्वतः राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन मी पत्नीचा खून केला असल्याचे त्याने कबुली दिली असल्याचे बोलले जात आहे.
घटनेची माहिती कळताच पोलिस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, स.पो.नि. रविंद्र पिंगळे संदिप परदेशी, अमोल पवार, पीएसआय चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील, पो कॉ सुरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, संदिप ठांणगे, संतोष राठोड, नदीम शेख, सचिन ठोंबरे, प्रविण आहिरे, गणेश लिपणे, रविंद्र पवार, गोवर्धन कदम, सतिश कुर्‍हाडे, अंकुश भोसले अदिसह ठसे तज्ज्ञ यांनी घटनेच्या ठिकाणी पाचरण केले. मयत उर्मिला हिचा मृतदेह शविच्छेदनासाठी नगर येथे पाठविण्यात आल्याचे समजते तर आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून सदर घटनेचा तपास पोलिस करत आहे.

खून करण्याचे खरे कारण पोलिस तपासातून होईल स्पष्ट ?
पतीने पत्नीचा नेमकं कोणत्या कारणातून खून केला? त्याने इतकी टोकाची भूमिका का घेतली.? यामध्ये काही नाजूक कारण असू शकते का? या घटनेमध्ये अजून काय उघड होणार? खून करताना अजून कोणी सामील होते का ? खरे प्रकरण नेमके काय याचा छडा पोलिस लावत आहे.

COMMENTS