लग्न म्हटलं तर आनंदाला पारावर नसतो. लग्नासाठी वरवधू अनेक स्वप्न मांडतात. आपल्या लग्नात काहीसे हटके करावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते.यूपीच्

लग्न म्हटलं तर आनंदाला पारावर नसतो. लग्नासाठी वरवधू अनेक स्वप्न मांडतात. आपल्या लग्नात काहीसे हटके करावे असे प्रत्येक जोडप्याला वाटत असते.यूपीच्या हाथरसमध्ये नववधूचा आनंदात गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवर बसलेली वधू हातात पिस्तुल घेऊन गोळीबार करताना दिसत आहे. या गोळीबाराने वधूच्या शेजारी बसलेला वरही एकदा घाबरला. मात्र, नववधूने स्वतःच्या लग्नात मंचावरून आनंदाने गोळीबार करून कायद्याचा अवमान केला.लग्न या गेस्ट हाऊसमध्ये झाले होते आणि यावेळी नववधूने तिथे जल्लोष केला. वधू हातरस जंक्शन परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS