नाशिक प्रतिनिधी- शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यपाल आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब
नाशिक प्रतिनिधी- शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज राज्यपाल आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या सारख्या दैवतांचा अपमान घटनात्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करता ही निंदनीय बाब असून येत्या 17 तारखेला यांसह महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या विषयांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. जर तुम्हाला वाटत होतं मोर्चा काढावा नाही तर कारवाई करायला हवी होती असे देखील राऊत यांनी म्हंटले आहे. विक्रांतच्या निधी घोटाळ्यात पैश गोळा झालेले आहे. हे सर्वांना माहीत असून ,पैशांचा अपहार झालेला आहे. जमा झालेले पैसे राजभवनात गेले. आणि राजभवन सांगतंय आमच्याकडे 1 रुपया देखील आला नाही, यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय हवा.
COMMENTS