Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भावी पिढीने संशोधन, कौशल्यावर भर द्यावा ः डॉ. गाडेकर

राहाता ः स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण विविध क्षेत्रात क्रांती केली आहे जगात भारत महासत्ता म्हणून उदयास येत आहे जागतिक स्तरावर व स्पर्धेत देशाला अ

VIRAL: भाऊ कदम खरंच स्क्रिप्ट कसे पाठ करतात? पहा हा धमाल व्हिडीओ | Lok News24
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून किचनमध्ये पुरला मृतदेह l पहा LokNews24
अहमदनगर जिल्ह्यात दोन कोटींची वीज चोरी पकडली

राहाता ः स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण विविध क्षेत्रात क्रांती केली आहे जगात भारत महासत्ता म्हणून उदयास येत आहे जागतिक स्तरावर व स्पर्धेत देशाला अधिकचा नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी भावी पिढीने संशोधन, कौशल्य विकास, क्रीडा आरोग्य कृषी या क्षेत्रात करियर करण्यावर भर द्यावा असे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. के वाय गाडेकर यांनी केले. येथील डॉ.के. वाय. गाडेकर माध्यमिक विद्यालयामध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण राहाता नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा श्री साईबाबा सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ के वाय गाडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. स्वाधीन गाडेकर, राहाता येथील बौद्ध विहाराचे भंते, मुख्याध्यापक दिलीप शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
     स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ के वाय गाडेकर म्हणाले की, स्वातंत्र्याचा 79 वा वर्धापनदिन साजरा करताना आपण जर देशाच्या इतिहासाकडे मागे वळून बघितले तर आपणास लक्षात येते की, जगात आपल्या भारत देशाने आरोग्य, शेती, औद्योगिक व्यावसायिक व्यापारी तसेच क्रीडा यासह सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळेच आपली वाटचाल महासत्ता होण्याच्या दृष्टीने चालू आहे आज ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा मध्ये भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास, कौशल्य विकासा सोबत क्रीडा व संशोधन क्षेत्राकडे करियर म्हणून बघितले पाहिजे आणि त्यादृष्टीने ध्येय व चिकाटी ठेवून त्यासाठी तयारी केली पाहिजे. विद्यार्थ्यांचे मनोबल आणि उत्साह वाढावा यासाठी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ एस.के.पाचोरे, वैभव कुलकर्णी, विजय त्रिभुवन,अविनाश हजारे, एस. व्ही. पवार, अशोक वाणी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे सर्व कर्मचारी शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS